Author: Hindavinewsnetwork@gmail.com
मनपाचे खासगीकरण थांबवा – चेतन पवार पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामध्ये पुनावळे येथील मनपा शाळेचे आरक्षण तुटपुंज्या रकमेवर खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. त्या आरक्षित जागेवर मनपाने गोर गरीब मुलांसाठी शाळा सुरू करावी. या शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देणे म्हणजे मनपाचे खासगीकरण करण्याचा प्रकार आहे. हा ठराव आयुक्तांनी मंजूर करू नये आणि मनपाचे खासगीकरण थांबवावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी…
इराण-इस्रायल युद्धबंदीच्या हालचाली; जागतिक शांततेसाठी भारताची डिप्लोमसी यशस्वी ठरल्याचा कामगारनेते यशवंत भोसले यांचा दावा पिंपरी,(हिंदवी न्यूज)-गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत सकारात्मक करार होत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर सुटकेचा श्वास घेतला जात असून, या युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा (डिप्लोमसी) मोठा वाटा राहिला आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी जागतिक शांतता कराराचे स्वागत केले आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना…
पिंपरी (हिंदवी न्यूज) – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये सदस्यपदी बहुमताने आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त, भीमाशंकर देवस्थानचे माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विकास विठ्ठलराव ढगे पाटील यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने नेहरूनगर न्यायालयातील सभागृहात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. नितीन पवार, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक भटेवरा, माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. जे के काळभोर आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना विकास ढगे पाटील यांनी, ‘पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचा मी बार कौन्सिल ऑफ…
मसाप चा साहित्य – सांगीतिक उपक्रम पिंपरी (हिंदवी न्यूज)-महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड आणि ‘स्वर प्रतिभा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत स्वर’ (गाणाऱ्या कविता) हा साहित्य – सांगीतिक कार्यक्रम निगडी प्राधिकरणातील कवयित्री शांता शेळके सभागृहात उत्साहात पार पडला. संत चोखामेळा व संत तुकाराम यांच्या अभंगांपासून ते गदिमा, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबूडकर, पी. सावळाराम आणि कृ. प्र. खाडिलकर अशा अनेक प्रतिभावंत कवींच्या अजरामर रचनांनी या कार्यक्रमात शब्दांची आणि सुरांची अनोखी मेजवानी रसिकांना दिली. म महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित कंठसंगीत रत्न पुरस्कार प्राप्त पं. कल्याण गायकवाड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवडचे…
“सुंदर माझे जाते गं… ” कविसंमेलन उत्साहात पिंपरी (हिंदवी न्यूज)- ‘जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळात बाई जात्यावर दळायला बसली की ओव्या सुचत आणि त्यातून आपले मौखिक लोकसाहित्य समृद्ध झाले!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. गोशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुम्, चिंचवडगाव येथे शब्दधन काव्यमंच तर्फे आयोजित जात्यावर दळताना साहित्य विश्वातील पहिल्या ‘सुंदर माझे जाते गं…’ या अभिनव कविसंमेलनाचे उद्घाटन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. छाया कांकरिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, प्रबोधनकार शारदा मुंडे, जात्यावरील ज्येष्ठ ओव्या गायिका इंदुबाई कणसे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.…
दिलासा संस्थेतर्फे “वृत्तपत्रे वाचा” जनजागृती उपक्रम पिंपरी,(हिंदवी न्यूज)- दिलासा संस्थेच्या वतीने “नियमित वृत्तपत्रे वाचा.! “वाचाल तर वाचाल” हा अभिनव उपक्रम पिंपळे गुरव – नवी सांगवी परिसरात घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड होते. याप्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रकाश घोरपडे,अरुण परदेशी, संगीता जोगदंड, वनिता पुजारी, मंदा भारतकर, डॉ. आर डी पाटील, सानिका पाटील, सुयश कदम, चंद्रकांत घाटे, शहाजी ढोरमले, वीणा मेंगरती, प्रमोद राऊत, संजय शितोळे आदी उपस्थित होते. आण्णा जोगदंड म्हणाले. “मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात वृत्तपत्र वाचन करणे लुप्त होऊ लागले आहे. सद्यस्थितीत युट्युब, तसेच सोशल माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या अनेक…
सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी,(हिंदवी न्यूज) – शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनातील समन्वय, विश्वास आणि परस्पर सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित समन्वयाने काम केल्यास उद्दिष्टे वेळेत व गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण होऊ शकतात. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासन अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख बनविण्यास भर द्यावा, अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला, त्यावेळी सूचना देताना ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी…
महापालिकेच्या विविध कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा पिंपरी, (हिंदवी न्यूज) – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बैठक घेऊन पिंपरीतील विकासकामांची सद्यस्थिती, प्रशासकीय कामकाज तसेच प्रलंबित प्रकल्पांची प्रगती याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठकीदरम्यान त्यांचे स्वागत केले. शहरातील सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती तसेच विविध विकासकामांची अंमलबजावणीबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगररचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले, उप आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, कार्यकारी अभियंता विजय भोजणे, तसेच महानगरपालिकेतील विविध विभागांचे…
महापालिकेतर्फे शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्योग समूहांसोबत संवाद बैठक पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड शहराची देशपातळीवरील वेगळी ओळख ही येथील उत्कृष्ट पायाभूत सुविधांमुळे निर्माण झाली आहे. शहराच्या विकासात आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीची (अर्थात उद्योगांचे सामाजिक दायित्व ) भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. शहरातील विविध उद्योग समूहांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून महापालिकेला दिलेल्या सहकार्यामुळे अनेक लोकाभिमुख उपक्रम आणि विकासकामे यशस्वीपणे राबविता आली आहेत. यापुढेही हे सहकार्य कायम ठेऊन उद्योगसमुहांनी शहराच्या विकासात उस्फूर्तपणे हातभार लावावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर. कक्ष अंतर्गत शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) – राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवून त्यांनी सरकारी शाळांचा कायापालट घडवून आणला. वाबळेवाडी आणि जळिंदरनगर येथील शाळांमध्ये त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे केवळ विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली नाही, तर त्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब त्यांच्या कार्याची परिणामकारकता अधोरेखित करणारी आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथील दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे सी. एस. आर. कक्षाअंतर्गत शहरातील विविध उद्योगसमुहांसवेत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात…