Author: Hindavinewsnetwork@gmail.com
पिंपरी,(हिंदवी न्यूज)– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पदपथावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असतात, त्यामुळे कोणत्याही पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांविरूद्ध महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई केली जाईल. तसेच काही दुकानदार आपल्या दुकानापुढे अतिक्रमण करून साहित्य ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अशा दुकानधारकांनी येत्या १५ दिवसांत असे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे, अन्यथा महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अतिक्रमण कारवाईच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस…
पिंपरी, (हिंदवी न्यूज )- ‘कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो आहे. राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव होण्यासाठी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांचे फार मोठे योगदान आहे!’ अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे शनिवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी व्यक्त केली. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने अण्णा हजारे यांना टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या हस्ते पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत पाटोळे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), राष्ट्रपती पोलीस…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ- चलन’ कारवाईतून वाहतूकदारांना मुक्तता मिळावी, यासाठी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला आहे. यापूर्वी मुंबई, आझाद मैदान येथे आणि पुण्यामध्ये आरटीओ कार्यालयावर वाहन चालकांनी आंदोलन केले आहे. तरी देखील या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही, ‘इ-चलन’ कारवाई चुकीची आहे. शासनाने बस मालकांना या त्रासापासून मुक्त करावे, अन्यथा पुन्हा राज्यात बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलनाच्या भडका उडेल ,असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी दिला. शुक्रवारी, (दि.२२ मे) पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपरी येथे झाली. यावेळी पिंपरी चिंचवड आरटीओचे पवन नवादे, महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, बोकी…
फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” व्याख्यानाचे प्रथम पुष्प पिंपरी, (हिंदवी न्यूज) – सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख आणि हाच खरा राष्ट्रवाद आहे. १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व सोडून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच भारत राष्ट्र उभारणीची सुरुवात होय. भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले. दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. गांधी आणि आंबेडकरांमध्ये मतभेद होते, परंतु देशासाठी ते एकत्र होते. त्याचे फलित म्हणजे भारतीय राज्यघटना आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सध्या सुरू असून, स्व-गणना (Self Enumeration) पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला एसई आयडी (SE ID) संबंधित गणनाकारांना द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणनाकार नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान स्व-गणनेत सादर केलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सादरीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांचा एसई आयडी गणनाकारांना उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. गणनाकारांकडून माहितीची पडताळणी आणि मान्यता झाल्यानंतरच ‘घर-यादी आणि गृहगणना’ प्रक्रिया पूर्ण मानली जाणार आहे. स्व-गणना…
सर्व विभागांना परस्पर समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना पिंपरी, (हिंदवी न्यूज) – आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. वारकऱ्यांचा मुक्काम, विसावा तसेच पालखी मार्गावरील ठिकाणी सर्व यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधांचे प्रभावी नियोजन करावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता पोलीस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी…
महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा; खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप पिंपरी,(हिंदवी न्यूज)-औंध-रावेत बीआरटी. रोडवरील रक्षक चौकातील उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाला. तीव्र उतारामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मोटार पलटी झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. या पुलाची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली होती. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नव्हती. तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होतील, अशी भीती व्यक्त केली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी पुलाचे उद्घाटन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी अपघात झाला. भविष्यात मोठा अपघात…
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात संताप पिंपरी, (हिंदवी न्यूज)- शहरात नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद उमटू लागले असून, आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी फलकाची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब गजधने ब्रह्मानंद जाधव, प्रसाद दौंडकर उपस्थित होते. नीट -यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली .…
पीसीयू आणि फिडेल सॉफ्टटेक यांच्या मध्ये सामंजस्य करार पिंपरी, (हिंदवी न्यूज)- विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांसोबत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण प्रणाली मध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्या अंतर्गत ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब’ची स्थापना करण्यासाठी फिडेल सॉफ्ट टेक सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार एआय सक्षम विद्यापीठ बनण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली. आकुर्डी येथील ट्रस्ट कार्यालय मध्ये पीसीयू आणि फिडेल सॉफ्टटेक कंपनी यांच्या मध्ये…
विश्वकोश निर्मिती मंडळ व पुस्तकांचे गाव भिलार येथे अभ्यास सहल पिंपरी, (हिंदवी न्यूज)- इंद्रायणी साहित्य परिषदेच्यावतीने वाई येथील प्रज्ञा पाठशाळा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि पुस्तकांचे गाव भिलार येथे नुकतीच अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयजित करण्यात आली होती. अभ्यास सहल अत्यंत प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय ठरली, मराठी भाषेसाठी चाललेले हे कार्य अनमोल ठेवा असल्याची भावना यावेळी सहभागी सदस्यांनी व्यक्त केली. या एकदिवसीय सहलीमध्ये साहित्य, वाचन, संस्कृती आणि इतिहास याविषयी उत्स्फूर्त चर्चा झाली. परिषदेचे पंचवीस सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. सरला रेवगडे, डॉ. सीमा काळभोर, परिषदेचे सचिव…