Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पिंपरी, (हिंदवी न्यूज) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, जाहिरात व्यवस्थापन तसेच विविध विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांना मान्यता देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्थायी समिती सभेत शहरातील विविध गावांमध्ये नगररचना योजना राबविण्यासाठी नियुक्त सल्लागार संस्थेस मुदतवाढ देणे तसेच संरक्षण विभागाला विविध ठिकाणसाठीच्या रहिवासी सदनिका उभारणी कामांसाठी मंजुरी देण्यात आली. याशिवाय शहरातील पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध…

Read More

ऊर्जा बचत प्रकल्पांसाठी निधी संरचना आणि अंमलबजावणीबाबत चर्चा पिंपरी,(हिंदवी न्यूज) : महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे केवळ अभ्यास, अहवाल आणि सादरीकरणांपुरते मर्यादित राहता कामा नयेत. प्रत्यक्ष अंमलबजावणीतून वीज वापरात लक्षणीय बचत आणि कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापनाचे ठोस परिणाम दिसून येणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करून ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत आणि शाश्वत विकास या तिन्ही उद्दिष्टांचा समतोल साधणारी कार्यपद्धती महापालिकेने स्वीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून वीज बचत, खर्च नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन…

Read More

भक्ती, संगीत आणि आत्मशोधाचा प्रवास घडवणारे भव्य नाटक – भाऊसाहेब भोईर  पिंपरी,(हिंदवी न्यूज)-  पंढरीची वारी हा जगातील असा एकमेव सोहळा आहे की, या सोहळ्यात सर्व अठरा पग्गड जाती एकत्र येऊन वारी मध्ये सहभागी होतात.  देहू, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारीत सहभागी होण्याचे आत्मिक समाधान हे अडीच तासात देण्याचा प्रयत्न “अंतर्नाद” या संगीत नाटकातून प्रेक्षकांना मिळेल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरेल असा ५१ कलाकारांचा सहभाग असलेल्या या प्रयोगात अभंग, गवळण, भारुड, पोवाड्याचा समावेश या सात्विक कार्यक्रमात आहे. अंतर्मनातील नाद समजून घेण्यासाठी आणि स्वतः मधला विठ्ठल शोधण्यासाठी सर्वांनी’अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी, (दि.१६) सायंकाळी ७ वाजता, चिंचवड येथील प्रा.…

Read More

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन पिंपरी, (हिंदवी न्यूज) : नीट  (NEET) परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडून पुणे शहरात तीव्र lनिषेध आंदोलन करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या व्यवस्थेविरोधात आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील उपस्थित होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि परीक्षा व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  *प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की,*“मागील काही वर्षांपासून NEET व इतर परीक्षांमध्ये…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. स्वच्छ, सुंदर आणि देशात अव्वल स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे असून, स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या कामगिरीचा महत्त्वाचा मापदंड मानला जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपला अभिप्राय नोंदवून शहराला स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि देशात अव्वल बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षणात दिलेला तुमचा अभिप्राय हा शहराच्या विकासाला दिशा देणारा ठरेल . त्यामुळे आपण सर्व मिळून पिंपरी चिंचवडला देशात प्रथम क्रमांकावर…

Read More

कबीर कांबळे भारतीय वनसेवेत होणार दाखल.  महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार पिंपरी, ( हिंदवी न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील मासुळकर काॅलनी येथील कबीर राहुल कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत देशभरातून १२५ वी रँक मिळवित भारतीय वन सेवा (Indian Forest Service – IFS) पदावर निवड होऊन शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय व प्रेरणादायी यशाबद्दल त्यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर तथा नगरसदस्या वैशाली घोडेकर, नगरसदस्या सारिका मासूळकर तसेच कांबळे  कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थितांनी कबीर कांबळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण…

Read More

पिंपरी,  (हिंदवी न्यूज)-  छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान सर्वश्रुत असले तरी युवा पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा इतिहास जिवंत स्वरूपात अनुभवता यावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांना अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून प्रत्येकाला हा इतिहास जीवंतपणे अनुभवण्याची संधी मिळेल, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रम, राष्ट्रनिष्ठा  आणि स्वराज्य रक्षणासाठी…

Read More

पिंपरी,(  हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड हे केवळ औद्योगिक शहर नसून क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर बनत आहे. आपल्या शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आहेत, ही प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी बाब आहे. जयदेव म्हमाणे यांच्यासारख्या खेळाडूंमुळे शहरातील युवा पिढीला नवी ऊर्जा मिळत आहे. अशा खेळाडूंच्या पाठीशी महापालिका कायम ठामपणे उभी राहील, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या विद्यार्थ्यांचा महापौर कार्यालयात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव उपस्थित होते.…

Read More

पिंपरी, (हिंदवी  न्यूज) जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी योग्य समन्वय साधून मजबूत जागतिक परिवर्तनकारी शैक्षणिक भागीदारी निर्माण केली पाहिजे. यासाठी ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सोबत एक दृढ नाते निर्माण करत आहे. याचा पुढील काळात दोन्ही संस्थांच्या विस्तारासाठी उपयोग होईल असे मत यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विभाग, सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट यांनी व्यक्त केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या…

Read More

पिंपरी,(हिंदवी न्यूज) आपल्या उपजत सौंदर्याबरोबरच परीक्षकांनी विचारलेल्या मार्मिक, तिरकस प्रश्नांना प्रचंड आत्मविश्वासाने उत्तर देऊन आपले व्यक्तिमत्व आणि बौद्धिकता सिद्ध करत जळगाव येथील वैष्णवी शिंपी हिने  “कॅलिस्टा इंडिया २०२६” या बहुचर्चित सौंदर्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा आकर्षक मानाचा मुकुट आणि रोख २० हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. कॅलिस्टा पेजंट्स आयोजित “कॅलिस्टा इंडिया २०२६” आणि “कॅलिस्टा मिस, मिसेस महाराष्ट्र २०२६” या सौंदर्यस्पर्धेत अंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या सौंदर्यवतींना मुकुट, रोख बक्षीस, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉल येथे आयोजित केलेल्या या अंतिम फेरीस कॅलिस्टा पेजंट्सचे कार्यकारी संचालक संजीव जोग, आधार पशुपक्षी मित्र फाउंडेशन व हमारा विश्व फाउंडेशनच्या संचालिका अनिता अग्रवाल, मायफिल्म…

Read More