Author: Hindavinewsnetwork@gmail.com

ऑनलाइन माध्यमातून २३० कोटींहून अधिक कर जमा,  “दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांचा प्रतिसाद पिंपरी, (हिंदवी न्यूज)-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मालमत्ता कर वसुलीत लक्षणीय प्रगती नोंदविली आहे. १ एप्रिल ते २९ मे २०२६ या कालावधीत महापालिकेकडे २५० कोटी ७२ लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत शहरातील २ लाख ४७ हजार ३७१ मिळकतधारकांनी मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये डिजिटल माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे दिसून आले असून, २ लाख २१ हजार ७६३ नागरिकांनी ऑनलाइन कर भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून २३० कोटी ५७ लाख…

Read More

शिक्षण, आरोग्य व नागरी सुविधांच्या नियोजनासाठी जनगणना माहिती महत्त्वाची पिंपरी, (हिंदवी न्यूज) -‘जनगणना २०२७’ अंतर्गत सुरू असलेली ‘घरसूचीकरण व घरगणना’ प्रक्रिया वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. महापालिका क्षेत्रात १६ मेपासून प्रगणकांमार्फत घरसूचीकरण आणि घरगणना प्रक्रिया सुरू असून, स्व-गणना माध्यमातून नागरिकांनी भरलेल्या माहितीची पडताळणी आणि अंतिम नोंदणी सध्या केली जात आहे. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला स्व-गणना ओळख क्रमांक (SE ID) प्रगणकांना उपलब्ध करून द्यावा, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. स्व-गणना ओळखक्रमांक…

Read More

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओल्या कचऱ्याची स्थानिक पातळीवर प्रक्रिया बंधनकारक; नियमभंगास दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा पिंपरी, (हिंदवी न्यूज )- शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिला आहे केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था अर्थात ‘बल्क वेस्ट जनरेटर्स’वर अतिरिक्त जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. दररोज १०० किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या, २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौक, पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, माजी नगर सदस्य राजू दुर्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक खरात तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.  सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आमदार शंकर जगताप, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी…

Read More

सत्ताधारी भाजप नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन निष्क्रिय – सुनिल गव्हाणे पिंपरी,(हिंदवी न्यूज) -पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरात विषारी मद्य प्राशन केल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात एकाच वेळी दुःखाची आणि संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी भाजप पक्ष सत्ताधारी आमदार आणि पोलीस प्रशासन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दापोडी येथे निषेध आंदोलन केले. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड…

Read More

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सेवानिवृत्तांचा सन्मान  पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेतून दिलेले योगदान संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे, अशा शब्दांत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.  तसेच यापुढे सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचा-यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्ती वेतन आदेश व देय रकमेचा लाभ देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना केल्या. महानगरपालिकेच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान समारंभात मे २०२६ अखेर नियत वयोमानानुसार ७२ तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १६ अशा एकूण ८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आयुक्त डॉ. विजय…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीपूर्ती निमित्त “विचार प्रबोधन पर्व” या विशेष उपक्रमाचे आयोजन मोरवाडी चौक, पिंपरी व नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे करण्यात आले आहे. रविवार  दिनांक ३१ मे रोजी विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाची सुरुवात रविवार ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० मिनिटांनी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यापक कार्य व प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ.…

Read More

रुग्णांच्या नातेवाईकांशीही साधला संवाद; महापालिका रुग्णालयात दाखल रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार पिंपरी, (हिंदवी न्यूज)- फुगेवाडी येथील विषारी दारू सेवन केलेल्या रुग्णांना महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. दाखल रुग्णांवर आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देखील आयुक्तांनी दिला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.…

Read More

 सुमारे ७ हजार ८९४ जणांनी घेतला लाभ पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी सेवा देण्यासाठी दि. १ मे २०२६ पासून महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई-प्रवेश’ ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १ मे २०२६ ते २५ मे २०२६ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या कालावधीत सुमारे ७ हजार ८९४ नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घेतला आहे. स्वागतम ई-प्रवेश प्रणालीअंतर्गत नागरिकांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर जाऊन ‘मुख्य इमारत प्रवेश प्रणाली’ या लिंकद्वारे आपली नोंदणी करणे सहज शक्य होत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश…

Read More

माहिती संकलन आणि नोंदींच्या अचूकतेसाठी दक्षता घेण्याचे निर्देश पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आणि कालमर्यादित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ही प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. जनगणनेदरम्यान माहिती संकलन, नोंदींची अचूकता आणि प्रशासकीय कामकाजामध्ये दक्षता बाळगावी. या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या गृहसूची व गृहनिर्माण जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन पिंपरी…

Read More