Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन नगर परिसरातील अंदाजे १३० चौरस मीटर क्षेत्रफळावरील ३ अनधिकृत आर.सी.सी. बांधकाम पाडण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई पार पडली. या कारवाईमध्ये उप अभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, महापालिका धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने यांच्यासह १८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते. १० मजूर, १ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर ब्रेकर यांच्या…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या धोरणानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी महापौर तथा नगरसदस्या अपर्णा डोके,…

Read More

पिंपरी ,(हिंदवी न्यूज)- यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी रुग्णालयाचा सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करत त्रुटी दूर करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. अभिषेक बारणे यांनी रुग्णालयातील सर्व संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या समवेत ४ थ्या मजल्यावरील वॉर्डची सविस्तर पाहणी केली. यावेळी रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेताना त्यांनी वॉर्डातील अत्यावश्यक सोयी, वैद्यकीय उपकरणांची स्थिती आणि लिफ्टच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांची दखल घेतली. लिफ्ट दुरुस्तीबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता, याबाबत तातडीने कार्यवाही…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)-पिंपरी चिंचवड शहरात जनगणना २०२७ च्या अनुषंगाने पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात घरयादी व घरगणनेच्या कामाला १६ मे २०२६ पासून अधिकृत सुरुवात झाली आहे. ही मोहीम १४ जून २०२६ पर्यंत चालणार असून, या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन नागरिकांकडून आवश्यक माहिती संकलित करणार आहेत. प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना योग्य आणि अचूक माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे. घरयादी व घरगणना ही जनगणनेची अत्यंत महत्त्वाची प्राथमिक पायरी मानली जाते. यामध्ये घरांची संख्या, रहिवाशांची माहिती, मूलभूत सुविधा आदी बाबींची नोंद केली जाते. या संकलित माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिका विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विधी समिती सभेत पावसाळा कालावधीसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी “आपदा मित्र” स्वयंसेवकांची प्रायोगिक तत्वावर नियुक्ती करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीस विधी समिती सदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त संदीप खोत, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या…

Read More

महापौरांच्या हस्ते गणेश तलाव, सेक्टर २६, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे वृक्षारोपण पिंपरी, (हिंदवी न्यूज)- स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहर योजना’ लवकरच सुरू करण्यात येईल, ही योजना महापालिका व नागरिकांच्या लोकसहभागातून यशस्वी करण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, शहरातील हरित क्षेत्र वाढविणे आणि नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने निगडी प्राधिकरण येथील गणेश तलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे आयोजित नियोजन बैठकीत महापौर रवि लांडगे बोलत होते.  या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या शैलजा मोरे,  नगरसदस्य अमित गावडे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत…

Read More

महानगरपालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी पिंपरी, (हिंदवी न्यूज) – छत्रपती संभाजी महाराज हे अद्वितीय शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे साक्षात प्रतीक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमधून राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहितासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यलक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील शिल्पास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

Read More

लवकरात लवकर कर भरून सवलतींचा लाभ घ्या, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व कर संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कर संकलन मोहीम सुरू असून, शहरातील मालमत्ताधारकांना महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात येत आहे. निवासी, बिगर निवासी, औद्योगिक तसेच इतर मालमत्ताधारकांना प्रत्यक्ष भेट देत बचत गटातील महिलांकडून आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४७ इतक्या मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांना वेळेत मालमत्ता कर भरून विविध सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत…

Read More

इंधन बचत व पर्यावरणपूरक जीवन शैलीचा दिला नागरिकांना संदेश पिंपरी, (हिंदवी न्यूज)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज आपल्या निवासस्थानापासून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकलने प्रवास केला. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांनाही शक्य तिथे सायकलचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. आज सकाळी महापौर रवि लांडगे हे आपल्या निवासस्थानातून सायकलवरून महापालिकेकडे रवाना झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकलने प्रवास करत त्यांनी नागरिकांना इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता…

Read More

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दिले किल्ल्याचे नाव, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनिक कामकाजाची कार्यक्षमता वाढविणे, नागरिकांना अधिक सुलभ व तत्पर सेवा उपलब्ध करून देणे तसेच वाढती लोकसंख्या व वाढलेला भौगोलिक कार्यक्षेत्राचा विस्तार विचारात घेता पालिकेच्या विद्यमान ८ प्रभाग समित्यांचे (क्षेत्रीय कार्यालये) पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे. प्रभाग समित्यांचे कार्यालयांना किल्ल्यांचे नाव देखील देण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९-अ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे प्रावधान आहे.…

Read More