Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | आळंदी मौजे पिंपळगाव गोलेगाव येथे उपवनसंरक्षक जुन्नर, मा. सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर, व मा. वन परिक्षेत्र अधिकारी, चाकण यांच्या मार्गदर्शना खाली मालकी क्षेत्रात लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला. पिंपळगाव मध्ये ऊसतोड कामगारांवर बिबट्याचे हल्ल्यात कामगार जखमी झाला होता. या जेरबंद झालेल्या बिबट्यास तपासणी व उपचारासाठी बिबट निवारा केंद्र माणिकडोह येथे पाठविण्यात आले आहे. या प्रसंगी वनपाल आळंदी आनंदकुमार इंदलकर. वनरक्षक दिपाली रावते, वनरक्षक नवनाथ पगडे, वन सेवक अजय कोळेकर, धनराज तोंडे, दौलत वाडेकर, किसन पारधी, राघू ठाकर यांचेसह इतर वन कर्मचारी उपस्थित होते. पिंपळगाव तर्फे चाकण येथील सरपंच विलासराव नाथु काकडे यांचा जमीन गट नंबर २७ मध्ये शेतातील…
हिंदवी न्यूज | आळंदी आळंदीतील भराव रस्त्यावर लोखंडी गेट, आळंदी देवस्थानचे सुरक्षा कर्मचारी असताना थेट सर्व प्रकारच्या गाड्या माऊली मंदिरासमोर थेट येतात. यामुळे भाविक आणि मंदिर व परिसर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भराव रस्त्यावर एकही गती रोधक नसल्याने वाहने सुसाट मंदिराकडे येतात. भराव रस्त्यावर नो पार्किंग बोर्ड नावापुरता असून ५० मीटर परिसरात दोन्ही बाजूने वाहन पार्क करण्यास मनाई असताना बेशिस्त पार्किंग वाढली असल्याने भाविक, नागरिकांना ये जा करण्यास गैरसोयीचे होत आहे. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आळंदी नगरपरिषदेने गावभर गतिरोधक बसविले. मात्र मंदिर परिसरातील वर्दळीचा मुख्य भराव रस्त्यावर गतिरोधक विकसित करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे तत्काळ भराव…
लोकनेते भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘कलाकार कट्ट्याचा’ वर्धापन दिन दिमाखात साजरा हिंदवी न्यूज | रंगभूमीला नवे कलाकार मिळावेत, नवोदितांच्या अभिनयाला संधी मिळावी व शहरातील नाट्यचळवळीला व्यापक व्यासपीठ मिळावे, या दृष्टीने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वर्गीय नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध ‘पुरुषोत्तम करंडक’च्या धर्तीवर ही स्पर्धा घेण्याची घोषणा विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा’च्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ही महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे. लोकनेते भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘कलाकार कट्टा’ने एका वर्षात विविध कलाप्रकारांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम केले…
हिंदवी न्यूज | पुणे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी (४ नोव्हेंबर) पहिल्याच दिवशी सुमारे ५० हजार प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शहरातील बहुतांश कार्यालये व व्यावसायिक आस्थापने बंद असतानाही मेट्रो प्रवासासाठी नागरिकांनी मोठी पसंती दर्शविली. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर नियमित कामकाज सुरू झाल्यावर या मेट्रो मार्गाला आणखी मोठ्या संख्येने प्रवासी मिळण्याची अपेक्षा आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरले. या स्थानकावरून दिवसभरात सुमारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. पुणे रेल्वे स्थानकासह शहराच्या विविध भागांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने या स्थानकावर प्रवाशांची…