Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | आळंदी दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र. जुना ११३७, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले. सदर आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना/ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख श्रीमती सीमा चारवे…
हिंदवी न्यूज | आळंदी देवाची ,दि.२ : सुमीत भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे व कैवल्य सतिश वासनकर या चार विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आळंदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोहम तुकाराम भांडवलकर व राजवीर युवराज वहिले या दोन विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर आळंदी नजीकच्या केळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर यश किरण वानखेडे (अमरावती) व कौस्तुभ संदीप दौंड (श्रीरामपूर, अहिल्यानगर) या विद्यार्थ्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आले. आळंदी स्मशानभूमीत एकाच वेळी चार विद्यार्थ्यांच्या चिता जळत असल्याचे ह्रदयद्रावक चित्र पहायला मिळाले.यामुळे आळंदी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, आळंदी नगरपरिषदेचे…
६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल ६६.४७ टक्के नागरिकांनी भरला कर हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ६१० कोटी ४४ लाखांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. पहिल्या सहामाहीत विविध कर सवलतींचा लाभ घेत कर भरणाऱ्यांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. यंदा ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० नागरिकांनी म्हणजे तब्बल ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. दरवर्षीप्रमाणे ऑनलाइन माध्यमातून बिल भरण्यास नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे. शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ७ लाख ६६ हजार…
सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२६: अभिजात मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठीचे संवर्धन आणि प्रचार प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तसेच ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यामध्ये साहित्यिक चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन, अभिवाचन यातून मराठीचे अंतरंग उलगडले जाणार आहेत. तर नाटक, सांगितिक कार्यक्रम, एकांकिका, लोककला, लावणी, गझल असा वैविध्यपुर्ण कार्यक्रमांतून अभिजात मराठीचा जागर केला जाणार आहे. या महाउत्सवाचे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड येथील…
हिंदवी न्यूज | आळंदी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटनासाठी गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या इयत्ता ११वी-१२वी विज्ञान शाखेतील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी बुडाले. या दुर्घटनेत यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर सर्व मृतदेह सापडले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे आळंदीसह परिसरात…
हिंदवी न्यूज | आळंदी : दिवेघाट येथे झालेल्या दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळून आळंदी बंद पाळण्याचे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी केले आहे. या बंदमध्ये आळंदीतील सर्व व्यापारी, व्यावसायिक, संस्था तसेच नागरिकांनी सहभागी होऊन शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदवी न्यूज | पिंपरी शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. २८ आणि ३० सप्टेंबर रोजी झालेल्या या शिबिरांमध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज आणि ल या दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील आतापर्यंत ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. थेरगाव येथील स्व. कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथेही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह आदींची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम, ताणतणावाचे…
हिंदवी न्यूज | पिंपरी वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने शहराची सेवा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका भक्कम पायावर उभी आहे, अशा शब्दांत सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सेवानिवृत्तांच्या कार्याचा गौरव केला. महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आयोजित सोहळ्यात सप्टेंबर २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले १९ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले २ असे एकूण २१ अधिकारी व कर्मचारी यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मुख्य लिपिक माया वाकडे तसेच नंदकुमार इंदलकर विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि…
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांसह ७ नगरपरिषदा व २ नगरपंचायतींलगतच्या क्षेत्रांना लाभ शेती विभागातील जमिनींवर नियमानुसार रहिवासी विकासाला परवानगी रस्त्यांच्या जोडणीसाठी एकसमान कार्यपद्धती लागू; शहरांलगतच्या हजारो जागामालकांना दिलासा हिंदवी न्यूज | पिंपरी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू झाल्याने, प्राधिकरणाच्या हद्दीतील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या सभोवतालच्या निर्धारित परिघस्त अंतरातील शेती विभागातील जमिनींवर रहिवासी बांधकामासाठी परवानग्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्षेत्रांतील रस्ते जोडणीबाबत स्पष्टता आणण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिपत्रकाद्वारे विशेष कार्यपद्धती निश्चित केली आहे. या निर्णयामुळे हजारो जागामालक व नागरिकांना दिलासा मिळणार असून, बांधकाम क्षेत्रासह नियोजित विकासालाही चालना मिळणार आहे.…
हिंदवी न्यूज | पिंपरी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या कळसुबाई शिखरावर (समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर) हॅप्पी फॅमिली ट्रेकर्स असोसिएशनच्या २० शिलेदारांनी यापूर्वी किल्ले राजगड, तोरणा, रायगड, ब्रह्मगिरी, अंजनेरी तर आता कळसुबाई येथे यशस्वी चढाई करून एक नवा इतिहास रचला आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. हातात टॉर्च, डोक्यावर हेडलॅम्प आणि मनात जिद्द घेऊन सर्व ट्रेकर्सनी बारी गावातून चढाईला प्रारंभ केला. थंडी, दाट धुके आणि खडतर चढण अशा अनेक अडचणीवर मात करत सकाळी १० वाजता सर्व ट्रेकर्स कळसुबाई मंदिर परिसरात पोहोचले. शिखरावर पोहोचताच सर्वांनी “हर हर महादेव” “जय महाराष्ट्र” चा जयघोष केला. ही मोहीम फक्त…