Author: Hindavinewsnetwork@gmail.com
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी – पुणे–लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन काम पूर्ण होण्याची निश्चित कालमर्यादा स्पष्ट करावी. तळेगाव, पिंपरी, देहूरोड आणि चिंचवड या प्रमुख स्थानकांवर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देणे तसेच अतिरिक्त आरक्षित डब्यांची सुविधा उपलब्ध करावी. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव आणि लोणावळा स्थानकांवरील कामांमध्ये आवश्यक सुधारणा करून ती तत्काळ पूर्ण करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची आढावा बैठक पार पडली. पुणे, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर विभागातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता…
भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा यज्ञ पेटवून आजही भारतीय तरुणांच्या मनात ती ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण
मनाच्या बंधनांतून मुक्त होणे हीच खरी मुक्ती – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज हिंदवी न्यूज | पिंपरी संत निरंकारी मिशनच्या वतीने या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ब्रह्मज्ञानातून प्राप्त होणाऱ्या अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा दिव्य संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यात आला. बाह्य बंधनांतून मुक्त होणे म्हणजेच खरी मुक्ती नव्हे; अज्ञान, अहंकार आणि भेदभाव यांपासून मुक्त होऊन आत्मबोध आणि परमात्मबोधाची अनुभूती घेणे, यातच खरी मुक्ती सामावलेली आहे, हा संदेश या पर्वातून देण्यात आला. संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे आ. सखाराम लवटे (मुंबई) यांच्या सान्निध्यात सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत विशेष सत्संग सोहळा झाला. भोसरी, चाकण, राजगुरुनगर व परिसरातील विविध भागांतून हजारो श्रद्धाळू…
हिंदवी न्यूज | पिंपरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांची जयंती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलसंवर्धनाची शपथ घेऊन साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रातील जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि जलसंवर्धनाच्या चळवळीला महत्त्वपूर्ण दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचे स्मरण करत महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. *जलसंवर्धनाची शपथ. “पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती असून त्याचा प्रत्येक…
नाट्य, संगीत, साहित्य, लोककला, मर्दानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी शहरातील गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी होणार गौरव हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच शहराच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली. महोत्सवाच्या आयोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महोत्सवाच्या स्वरूपाची व…
हिंदवी न्यूज | पिंपरी भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांची जयंती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामुहिक सद्भावना शपथ घेऊन साजरी करण्यात आली. दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त महापौर रवि लांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांनी देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी तसेच सर्व धर्म, भाषा व समुदायांमध्ये परस्पर आदर व सद्भावना वाढविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची आणि परस्परांमधील सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची आज दि. 21-8-2026 रोजी पिंपरी येथे झालेल्या कार्यकारणी मिटिंग मध्ये सर्वांनूमते पुढील कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के, कार्याध्यक्ष-प्रविण (बाबु) कांबळे, उपाध्यक्ष-अविनाश पर्बत, बद्रिनारायन घुगे, विकास साळवे, सरचिटणीस-ओमप्रकाश पांडे, खजिनदार-दिनेश दुधाळे, सहखजिनदार-संजय धुतडमल, कार्यकारीणी सदस्य-तुळशीदास शिंदे, गोविंद देशपांडे, प्रदीप सपकाळ, सारीका भिंगे, पंकज लालझरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती-अनिल भालेराव, सल्लागार-बाळासाहेब ढसाळ महिला अध्यक्षपदी- माधुरी कोराड, महिला उपाध्यक्षा-श्रध्दा प्रभुणे यांची निवड करण्यात आली. पिंपरी चिंचवड डिजीटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे, कार्याध्यक्ष-देवा भालके, उपाध्यक्ष- गौरव साळुंखे, विकास चौधरी, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस-भिमराव बरगडे, सहसरचिटणीस-निलेश सायकर, खजिनदार- श्याम…