Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी, पुणे (दि. ५ ऑक्टोबर २०२६) वास्तुशास्त्र म्हणजे संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि भावना यांचे एकत्रीकरण करून उभारलेल्या इमारतीचे प्रतीक असते. विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता सामोरे जावे. आपल्या कामाप्रती श्रद्धा, सबुरी आणि साधना या मूल्यांचा जीवनात उपयोग केल्यास यश आणि आनंद अनुभवता येईल असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तुविशारद गिरीश दोशी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन येथे वास्तूविशारद पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर्किटेक्ट गौरव भांगरे, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन च्या प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, परीक्षा अधिकारी…
हिंदवी न्यूज | पिंपरी कॉर्पोरेट क्षेत्रात सक्षम नेतृत्व घडविण्यासाठी पुणे बिझनेस स्कूलचा दोन वर्षाचा व्यवस्थापन अभ्यासक्रम मार्गदर्शक आहे. याठिकाणी उच्च शिक्षणाबरोबरच नेतृत्व आणि व्यावसायिक सक्षमता, नाविन्य, बदलत्या व्यावसायिक वातावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होईल, त्याचा पीबीएस च्या विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले करिअर घडवावे आणि देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे असे मार्गदर्शन पीबीएसचे संचालक व प्राचार्य डॉ. गणेश राव यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पुणे बिझनेस स्कूल मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीबीएसच्या डीन डॉ. मीनाक्षी त्यागी, मास्टर कार्डचे मध्यपूर्व आफ्रिका आणि युरोप संचालक हेमंत शर्मा, इंडिया डिजिटल ॲग्रीकल्चर कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत त्यागी,…
हिंदवी न्यूज | पिंपरी कंत्राटी, कायम व हंगामी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती कामगारनेते तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे येथे(दि.४) जगद्गुरु संत तुकाराम महाराज येथील सभा मंडपात भव्य कामगार मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात कंत्राटी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सन २०२५-२६ चा बोनस कायद्यानुसार दिवाळीपूर्वी देऊन सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व बोनस देण्यात यावा. तसेच सफाई कर्मचारी व नर्सेस यांना पाच…
हिंदवी न्यूज | पिंपरी शब्दांमधील भाव जाणून घेत त्यांना स्वरांची साथ देत जन्माला आलेली गाणी आणि त्या गीतांच्या निर्मितीमागच्या असंख्य आठवणी… कधी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या स्वरांची आठवण, तर कधी आशा भोसले यांच्या गायकीचा संदर्भ, कधी शांता शेळके आणि सुरेश भट यांच्या शब्दांमागच्या कथा… अशा शब्द-सूर-आठवणींच्या त्रिवेणीने पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ ही मैफल रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३…
हिंदवी न्यूज | पिंपरी ज्या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ लिहीले गेले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची गरजच नाही, ती भाषा मुळातच अभिजात आहे. या अभिजात मराठीतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. मला जेव्हा असे काव्य सापडत गेले, तेव्हा त्याला चाली देत गेलो. माझ्या बालपणापासूनच आईकडून ऐकलेल्या गोष्टी आणि नंतर तिने वाचून दाखवलेल्या पुस्तकांमधून भाषेचे सौंदर्य माझ्या मनावर संस्कार करत गेले. माझी मोठी बहीण स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हिच्या आशीर्वादाचा माझ्या संगीतसाधनेत मोठा वाटा आहे. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि…
हिंदवी न्यूज | पिंपरी संतवाणीतील भक्तिभावापासून ते पोवाड्याच्या जोशापर्यंत, लावणीच्या ठेक्यापासून ते भारूडाच्या सामाजिक आशयापर्यंत आणि ओव्यांच्या भावविश्वापासून पंढरीच्या विठ्ठलापर्यंतचा सुरेल प्रवास ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ या नाट्य-संगीतमय आविष्कारातून रसिक प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेला. अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ तसेच ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत…
हिंदवी न्यूज | पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी स्वरदा यादव हिने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात झालेल्या या १७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत रोप मल्लखांब व पोल मल्लखांब यामध्ये स्वरदा यादव हिने सर्वात जास्त गुण मिळवले यामुळे तिची पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक धनाजी पाटील हे तिचे मार्गदर्शक आहेत. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये शालेय…
हिंदवी न्यूज | पिंपरी, (दि. ३ ऑक्टोबर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सध्या मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. या संस्थेचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य शैक्षणिक संकुल उभारणे, तसेच या संस्थेच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर शिक्षणाचे जाळे वाढवून दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. हे ध्येय गाठण्यासाठी या संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची निवड योग्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती…
हिंदवी न्यूज | भोसरी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संचालित निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्ट यांच्या वतीने ‘स्वरभक्ती – एक सुरेल भक्ती संध्या’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड, भोसरी येथे उत्साहात करण्यात आले. सन २०१५ मध्ये बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्टच्या देशभरात २५ शाखा कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड मधील रूपीनगर शाखेत गेल्या एक वर्षापासून संस्थेच्या संगीत प्रशिक्षणाच्या उपक्रमांना सुरुवात झाली असून, अनेक विद्यार्थी नियमितपणे संगीताचे…
हिंदवी न्यूज | आळंदी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. वैभवराज रौंदल यांच्या आदेशान्वये *अर्जुन मेदनकर* यांची *पुणे जिल्हा अध्यक्ष – धार्मिक प्रकोष्ठ* पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेतर्फे प्रमाणित करण्यात येते की, श्री. अर्जुन मेदनकर हे यापुढे पुणे जिल्ह्यात धर्म रक्षा, गो रक्षा व देशहिताची कार्ये अधिक जोमाने पुढे नेतील. त्यांच्या या नियुक्तीमुळे हिंदू महासभेच्या विचारांचा प्रचार व प्रसार पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावापर्यंत पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल अर्जुन मेदनकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.