Author: Hindavinewsnetwork@gmail.com
२२ आरएमसी प्रकल्पांची तपासणी, नियमभंग करणारे १४ प्रकल्प सील पिंपरी (हिंदवीन्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम व औद्योगिक आस्थापनांकडून होणाऱ्या धूळकणांच्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७ ऑक्टोबर २०२५ च्या पत्रान्वये आरएमसी प्रकल्प संचालनासंबंधी मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांमार्फत शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांवर व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २२ आरएमसी प्रकल्पांची सखोल पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पर्यावरणीय नियम व…
सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे इ क्षेत्रीय कार्यालयाचा तर तानाजी नरळे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण व अभिलेख कक्षाचा दिला पिंपरी (हिंदवीन्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे इ क्षेत्रीय कार्यालयाचा व तानाजी नरळे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण व अभिलेख कक्षाचा पदभार सोपवण्यात आला आहे. पशुवैद्यकीय व कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त म्हणून संदीप खोत हे काम पाहत होते. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार (पशुवैद्यकीय विभागासह) सोपविण्यात आला आहे. उपायुक्त खोत यांच्याकडील…
लघुउद्योग व उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक पिंपरी (हिंदवीन्यूज) एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, घातक कचरा व्यवस्थापन तसेच लघुउद्योगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. उद्योगधंद्यांना सक्षम, सुरक्षित आणि विकासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. एमआयडीसी भागांचा सर्वांगीण विकास हा महापालिकेचा प्राधान्यक्रम असून, मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आणि कामांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात शहरातील लघुउद्योग संघटना तसेच एमआयडीसीमधील विविध उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी…
पिंपरी (हिंदवीन्यूज) पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी नुकतीच आकाशवाणी पुणे केंद्राला सदिच्छा भेट दिली. या सदिच्छा भेटीत आकाशवाणी पुणे अ केंद्र आणि विविध भारती या दोन्ही स्टुडिओंद्वारे कशाप्रकारे कामकाज चालते याबाबत त्यांनी माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आकाशवाणीच्या अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक अधीर गडपाले व प्रादेशिक वृत्त विभागाचे सहाय्यक संचालक माधव जायभाये यांच्याशी चर्चा करून आकाशवाणी पुणे केंद्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, या केंद्राद्वारे प्रसारित होणारे कार्यक्रमांचे स्वरूप तसेच प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे प्रसारित होणारी विविध बातमीपत्र आणि वृत्तविषयक कार्यक्रम आदींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कामकाज जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आकाशवाणी या प्रसार माध्यमाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे;असे सांगत पंतप्रधान नरेंद्र…
चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला सपत्नीक दिली भेट, प्रलंबित कामांचा घेतला आढावा पिंपरी (हिंदवीन्यूज) क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. ही वास्तू प्रत्येकाला देशप्रेमाची प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांच्यासह अक्षय्य तृतीया तसेच नुकत्याच झालेल्या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय ‘क्रांतितीर्थ’ येथे भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, अतुल आडे, महापालिका उपायुक्त पंकज पाटील तसेच…
किवळे परिसरात महापौरांची प्रत्यक्ष पाहणी; एसटीपी सक्ती, दंडात्मक कारवाई आणि जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश पिंपरी ( हिंदवी न्यूज) किवळे परिसरातील सिम्बॉयसिस कॉलेज व आसपासच्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून नाल्यांद्वारे थेट पवना नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कडक कारवाईचे निर्देश दिले यावेळी नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, माजी नगरसदस्य तुकाराम भोंडवे, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, उपअभियंता दीपक करपे, कनिष्ठ अभियंता प्रसाद संकपाळ तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरांनी पाहणीदरम्यान स्पष्ट शब्दांत सांगितले की,“नाल्यांद्वारे थेट सांडपाणी नदीत सोडणे हा गंभीर पर्यावरणीय गुन्हा असून, अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” महापौरांचे ठोस निर्देश व कार्यवाही:…
यंदाही मूलींनी मारली बाजी. हिंदवी न्यूज (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा (SSC) निकाल आज (दि. ८ मे २०२६) जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ९२.०९% लागला आहे. कोकण विभाग ९७.२४% निकालासह राज्यात अव्वल ठरला असून यंदाही मुलींनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे. राज्यात यंदा एकूण १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांचा निकाल ८९.५६ टक्के एवढा लागला. तुलनेने मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी जास्त असल्याचे पहायला मिळाले. खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७६.३३ टक्के…
पिंपरी (हिंदवी न्यूज) यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिं. ८ मे २०२६ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या निकालानंतर दहावीतील विद्यार्थ्यांना व पालकांना कित्येक दिवसांपासून निकालाची प्रतिक्षा होती. अखेर उद्या राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारा हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पहाता येणार आहे. विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर आपला निकाल पहाता येणार आहे. 1. https://results.digilocker.gov.in 2. https://mahahsscboard.in 3. https://sscresult.mkcl.org निकाल पहाण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, त्यानंतर SSC Examination result 2026 या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर तसेच आईचे नावातील सुरवातीची तीन…
पिंपरी (हिंदवीन्यूज) मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचा प्रारंभ बुधवार, दि. ०६ मे रोजी होणार आहे. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, प्लॉट क्रमांक ५१३, पेठ क्रमांक २७, संत तुकाराममहाराज उद्यानासमोर, निगडी प्राधिकरण येथे दररोज सायंकाळी ठीक ०६:३० वाजता व्याख्यान सुरू होईल. मधुश्री व्याख्यानमाला यंदा सोळाव्या वर्षात पदार्पण करीत असून सहा मे रोजी गणेश ठोकळ ‘स्वराज्याचा अपरिचित इतिहास’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफलेजाईल. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी रिजन चेअरमन दामाजी आसबे हे अध्यक्ष आणि नगरसेविका शैलजा मोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती राहणार आहेत. गुरुवार, दिनांक…
पिंपरी (हिंदवी न्यूज) महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचा दिलासा साहित्य संस्थेच्या वतीने साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. अशोकमहाराज गोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पगडी, उपरणे आणि अभंग गाथा देऊन सन्मान करण्यात आला. निमित्त होते कवी प्रा. डॉ.नितीन करडेकर यांच्या ” कनिक’ या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाचे. दिलासा साहित्य संस्थेने या काव्यसंग्रह प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री आणि बाल साहित्यकार डॉ. संगीता बर्वे, साम टीव्हीचे माजी व्यवस्थापक हनुमंत कुंभार, ज्येष्ठ चित्रकार रमेश नावडकर, दिलासा साहित्य संस्थेचे नारायण कुंभार, प्रकाशक सुनील उंब्रजकर, राधाबाई वाघमारे, विजय शेंडगे,अर्जुन…