Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»४ टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबर शेवटचा दिवस
पिंपरी चिंचवड

४ टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबर शेवटचा दिवस

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 29, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील दुसऱ्या तिमाहीसाठी मालमत्ताधारकांना मालमत्ता कराच्या ऑनलाइन भरण्यावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. ही सवलत १ जुलै २०२६ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा करणाऱ्या नागरिकांना लागू आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी उद्या बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची मुदत आहे. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन कर भरून सामान्य करामध्ये मिळणाऱ्या ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

१ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४ टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. ऑनलाइन कर भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी, यासाठी महानगरपालिकेकडून ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

दरम्यान, १ एप्रिल २०२६ ते २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ४ लाखांहून अधिक नागरिकांनी ६०१ कोटींचा मालमत्ता कर भरला आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, ऑनलाइन तसेच इतर उपलब्ध माध्यमांतून नागरिकांकडून कराचा भरणा करण्यात येत आहे.

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून, त्यातून शहरातील विविध नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि विकासकामे राबविण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरून महानगरपालिकेच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, ३० सप्टेंबरनंतर थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर थकीत मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आपला थकीत मालमत्ता कर विहित मुदतीत भरावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

मालमत्ता कर हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा आर्थिक स्रोत आहे. नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कराचा भरणा करून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास महानगरपालिकेला शहरातील पायाभूत सुविधा आणि विविध नागरी सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी कर भरण्याची आपली जबाबदारी पार पाडून शहराच्या विकासात सहभागी व्हावे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका*

 

💬🗣मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी कराचा भरणा करून महापालिकेच्या वसुली कारवाई टाळावी. ३० सप्टेंबरनंतर मोठ्या प्रमाणात थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाईची प्रतीक्षा न करता थकीत कराचा भरणा तातडीने करावा. तसेच, चालू कराचा ऑनलाइन भरणा करून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. वेळेत कर भरणे ही केवळ आर्थिक जबाबदारी नसून शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग आहे.

-सचिन पवार , उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Discount Benefit Last Date Offer Deadline
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजयोगानेच सामाजिक समस्यांवर उपाय, स्व-दर्शन शक्य – राजयोगी बी.के. अच्युत
Next Article कामगारांना न्याय देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले – रवींद्र चव्हाण
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?