Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 30, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक संपन्न; प्रायोगिक प्रकल्पाच्या तातडीने अंमलबजावणीच्या सूचना

 

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती द्यावी. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व नियोजनासंदर्भातील सर्व कार्यवाही तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करावा आणि नागरिकांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारे शहरीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रवाशाभिमुख करण्याच्या दृष्टीने एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि वर्तुळाकार मार्ग विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै २०२६ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अति पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या संकल्पनेची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. ही प्रणाली मेट्रोप्रमाणेच वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी असून रबर टायरवर धावणाऱ्या पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित असेल. एका वाहनामध्ये सुमारे २४० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, अशी क्षमता या प्रणालीमध्ये असेल, असेही ते यावेळी म्हणाले.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून सुमारे १७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या मार्गामध्ये गोडाऊन चौक – कुदळवाडी चौक – ऑटो क्लस्टर – काळेवाडी फाटा – जगताप डेअरी चौक – वाकड या प्रमुख भागांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प महामेट्रोच्या सहकार्याने सुमारे एक ते दीड वर्षांच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन बैठकीत मांडण्यात आले.

प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर एचसीएमटीआर व शहरातील सर्व बीआरटी मार्गांवर ई-आरटीएस प्रणालीचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी प्रभावी व सुलभ जोडणी निर्माण करून नागरिकांना अखंड, जलद आणि प्रवाशाभिमुख प्रवासाचा अनुभव देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले.

या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणात घट होण्यास, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.

सादरीकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संकल्पनेचे स्वागत करून प्रकल्पास मान्यता दर्शविली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ई-आरटीएस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करावी, तसेच प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एचसीएमटीआर आणि ई-आरटीएस प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडून येण्यास मदत होणार असून, भविष्यातील शाश्वत, आधुनिक आणि एकात्मिक शहरी वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर आणि ई-आरटीएस या एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडली. शहरातील मेट्रो, बीआरटी आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना प्रभावीपणे जोडणारी, पर्यावरणपूरक, उच्च क्षमतेची आणि प्रवाशाभिमुख अशी ही प्रणाली विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री महोदयांनी प्रकल्पाच्या संकल्पनेचे स्वागत करत त्याच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महानगरपालिका या प्रकल्पाची नियोजनबद्ध आणि वेळेत अंमलबजावणी करून नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ‎

Erts cm meet
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसरकारी अनास्थेमुळे मराठी शाळा बंद पडताहेत: प्रा मिलिंद जोशी
Next Article शिवप्रेमी साहित्यिक संभाजी बारणे यांची मसापच्या सल्लागार पदी निवड
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?