Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»कारगिल विजय दिन सप्ताहानिमित्त सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये शौर्याला मानवंदना
पुणे

कारगिल विजय दिन सप्ताहानिमित्त सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये शौर्याला मानवंदना

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 5, 2026Updated:August 5, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

माजी नौदल अधिकारी सुदीर चौहान यांचे विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन

हिंदवी न्यूज | पुणे 

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या प्रेरणेतून, उपाध्यक्षा सौ. सुषमा एस. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एव्हीपी सौ. स्नेहल नवलखा यांच्या सहकार्याने सूर्यदत्त नॅशनल स्कूल, बावधन येथे कारगिल विजय दिन सप्ताह देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्याच्या अद्वितीय पराक्रमाला मानवंदना अर्पण करत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि सैनिकांविषयी आदरभाव जागृत करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

भारतीय जवानांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण आठवडाभर विविध देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील प्रमुख उपक्रम म्हणून विशेष प्रार्थना सभा आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमासाठी भारतीय नौदलातील माजी स्टोअर पेटी ऑफिसर (SPO) श्री. सुदीर चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी तब्बल १५ वर्षे भारतीय नौदलात उल्लेखनीय सेवा बजावत देशसेवा केली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक, हेड बॉय आणि हेड गर्ल यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून रोप भेट देऊन केली. त्यानंतर कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिनाचे महत्त्व, १९९९ च्या कारगिल युद्धातील भारतीय सैन्याचे अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदान याविषयी माहिती सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. सुदीर चौहान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या सैन्य सेवेतले अनुभव सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, शिस्त, धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि निःस्वार्थ देशसेवा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.
देशासाठी दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल शाळेच्या वतीने श्री. चौहान यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांशी संवाद साधत समूह छायाचित्रे काढली.

कारगिल विजय दिन सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी विविध आंतरगृह स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा, तिसरी ते पाचवी तसेच सहावी ते आठवीसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा, तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आल्या.

पत्रलेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कारगिलच्या वीर जवानांप्रती कृतज्ञता, अभिमान आणि आदर व्यक्त करणारी हृदयस्पर्शी पत्रे लिहिली.या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या चित्रांमधून, निबंधांमधून आणि पत्रांमधून भारतीय सशस्त्र दलांविषयीचा आदर, राष्ट्रीय एकात्मता, धैर्य, कर्तव्यभावना आणि देशसेवेची प्रेरणा प्रभावीपणे व्यक्त झाली.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची जाणीव रुजविण्यावर सूर्यदत्तचा नेहमीच भर असल्याचे सांगितले. स्नेहल नवलखा यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव होत असून त्यांच्यात राष्ट्राविषयी अभिमान, जबाबदारी आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.
“वीरांना सलाम… शौर्याला मानाचा मुजरा!” करत भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचा सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये सन्मान करण्यात आला.

कारगिल विजय दिन सप्ताहानिमित्त आयोजित या विविध देशभक्तिपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्याचा सन्मान आणि देशसेवेची प्रेरणा अधिक बळकट झाली. देशाच्या वीर जवानांना अभिवादन करत सूर्यदत्त नॅशनल स्कूलने पुन्हा एकदा मूल्याधिष्ठित, जबाबदार आणि राष्ट्राभिमानी नागरिक घडविण्याच्या आपल्या वचनबद्धतेची प्रचिती दिली.

Bhartiya sainya kargil vijay divas
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्ञानसूर्य मावळला; पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
Next Article 10 कोटी नशामुक्त अभियानाला पत्रकारांचा पाठिंबा, बोपोडी सेंटरला भेट
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

विद्यार्थ्यांनी केवळ पदवी नव्हे, तर एव्हिएशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे :- अभिषेक बारणे

August 22, 2026

चाकण परिसरातील कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

August 21, 2026

कदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

August 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?