हिंदवी न्यूज | पिंपरी
नवदुर्गा म्हणजे केवळ देवीची नव्हे तर स्त्रीच्या सामर्थ्याची, शक्तीची, तिच्या कर्तृत्वाची आणि संघर्षाची ओळख आहे. नारी ही केवळ घरापुरती मर्यादित नाही. तर ती आपल्या कुटुंबाबरोबरच समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असते, पूर्वी स्त्रिया चूल व मूल यापुरत्याच मर्यादित होत्या. पण आजची स्त्री स्वतःच्या कर्तृत्वातून आकाशाला गवसणी घालत आहे. स्त्रियांचा केवळ लाभार्थी म्हणून नाही तर प्रत्येक निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, सर्व क्षेत्रांत त्यांना संधी द्यावी, असे आवाहन नगरसेविका सौ श्रुती राम वाकडकर यांनी केले.
नवरात्रीनिमित्त मी हाच संदेश देईन की आपल्या सर्वांमध्ये एक देवी शक्ती आहे, ती ओळखण्याची गरज आहे. संघर्षातून उभे राहून आपल्या हक्कासाठी लढा. आपल्या मुलीना उच्च शिक्षण व सुरक्षित जीवन द्या. स्वतःला कधीही कमी लेखू नका आणि कितीही मोठे संकट आले तरी खंबीरपणे उभे रहा. नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!..





