Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»महापालिका क्षेत्रात सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

महापालिका क्षेत्रात सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज 

पिंपरी, दि. २६ सप्टेंबर २०२६::पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत विविध उपाययोजना करण्यात आल्या. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती तसेच शाडू मातीच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे.

गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता पर्यावरणपूरक पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने एकूण ६३ कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. या माध्यमातून सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून, यामध्ये सुमारे ३८ हजार ८६ पर्यावरणपूरक म्हणजेच शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा समावेश आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध आकडेवारीनुसार, अ क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ७८०, ब क्षेत्रीय कार्यालयात २० हजार ५२३, क क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ३७२, ड क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ८०, इ क्षेत्रीय कार्यालयात १५ हजार ४२०, फ क्षेत्रीय कार्यालयात ७ हजार ३०८, ग क्षेत्रीय कार्यालयात १० हजार २८, ह क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ९६, ज क्षेत्रीय कार्यालयात २६ हजार ५२३ आणि ल क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ११६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

*निर्माल्य संकलन व व्यवस्थापनावर विशेष भर*

गणेशोत्सवाच्या कालावधीत निर्माल्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने विशेष व्यवस्था केली. उपलब्ध दैनंदिन नोंदीनुसार एकूण ६७ हजार ७७९.४५ किलो म्हणजेच सुमारे ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे.

फुले, हार आणि अन्य निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन व प्रक्रिया करण्यावर भर देण्यात आला. निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता स्वतंत्रपणे संकलित केल्यामुळे जलप्रदूषण कमी करण्यास मदत झाली.

*पुनरावर्तनातून शाडू मातीच्या पुनर्वापराला चालना*

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शाडू मातीच्या पुनर्वापरावरही भर देण्यात आला. उपलब्ध नोंदीनुसार १ हजार ७७१ किलो शाडू मातीचे संकलन करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ४८९ किलो माती पुनर्वापरासाठी स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेशमूर्ती विसर्जनानंतर उपलब्ध होणाऱ्या शाडू मातीचा योग्य प्रकारे पुनर्वापर व्हावा, यासाठी नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून मातीचा पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापरासोबतच विसर्जनानंतर उपलब्ध होणाऱ्या मातीचे पुनर्चक्रण करण्याच्या संकल्पनेला यामुळे चालना मिळाली.

गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक व शाश्वत पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सुविधा आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. कृत्रिम विसर्जन तलावांच्या सुविधेमुळे नदी, नाले, तलाव आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये थेट मूर्ती विसर्जित होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर, कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन आणि शाडू मातीचा पुनर्वापर यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागला.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’; भारतीय जैन संघटनेच्या शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला उपक्रम
Next Article महापालिकेकडून विसर्जन घाटांवर स्वच्छतेची तत्पर यंत्रणा
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?