Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड महापालिका»अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड महापालिका

अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
फुटपाथ अतिक्रमणमुक्त करून सलग पादचारी मार्गिका तयार करा; विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि विविध नागरी समस्यांवर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात अतिक्रमणविषयक आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. अतिक्रमण कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी संबंधित ठिकाणी आयुक्त स्वतः भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सिताराम बहुरे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शहरातील अनधिकृत दुकाने आणि बांधकामे हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करावेत. पादचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता यावे, यासाठी फुटपाथची सलग जोडणी (फुटपाथ कनेक्टिव्हिटी) कायम ठेवावी. अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून आवश्यकतेनुसार पाडकाम करावे, तसेच अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.

*शहरात स्वच्छता आणि नागरी सुविधांवर भर

शहरातील सार्वजनिक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना स्वच्छ परिसर दिसेल अशा पद्धतीने दृश्यमान स्वच्छता (व्हिजिबल क्लीनलिनेस) राखावी, असे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील गळतीच्या समस्या तातडीने दूर करून आवश्यक दुरुस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले. बीआरटी मार्गालगतच्या महापालिकेच्या पार्किंग सुविधांचा योग्य वापर सुनिश्चित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

*नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करा

शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यांवर केलेले अनधिकृत कल्व्हर्ट संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच हटवावेत. तसेच सोसायट्यांच्या माध्यमातून नाल्यांवर कल्व्हर्ट उभारण्यात आले असल्यास त्याची जबाबदारी संबंधित सोसायटीने घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाचे पाणी अडवले जाणार नाही किंवा त्याचा प्रवाह अन्यत्र वळवून नागरिकांच्या मालमत्तांना धोका निर्माण होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले

*आरएमसी प्लांटसाठी झोन व जागा निश्चित करण्याचे निर्देश

शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांटच्या नियोजनाबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शहरात असलेल्या ६५ आर एम सी साइट्सनी निर्धारित नियम व निकषांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या प्लांटसाठी स्वतंत्र झोन निश्चित करून त्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याबाबत नियोजन करावे. व्यावसायिक कारणांसाठी या प्लांटचा वापर करणाऱ्यांनी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

strict-action-against-encroachments-and-unauthorized-constructions-commissioner-vijay-suryawanshi
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश
Next Article पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

November 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?