Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»गणराया दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे – सचिन अहिर
पिंपरी चिंचवड

गणराया दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे – सचिन अहिर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 27, 2026Updated:September 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

दुष्काळ विषयावर विशेष अधिवेशन नाही – सचिन अहिर

हिंदवी न्यूज  | पिंपरी 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट आले आहे. गणराया दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे, अशी मागणी मी गणपती बाप्पाच्या चरणी आज केली आहे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

गुरुवारी, (दि.२४) भोसरी येथील सीआयइ ऑटोमेटिव्ह इंडिया लि. या कंपनीच्या गणपतीची आरती सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे, शिवसेना उपनेते व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे, सीआयइ कंपनीचे अधिकारी विनायक कळसकर, निवृत्ती बच्छाव, बाळासाहेब पाटील, प्रशांत शर्मा, कामगार संघटनेचे पदाधिकारी कृष्णदेव थोरात, दीपक अरगडे, सुभाष जमादार, दत्तात्रय धावडे, ज्ञानेश्वर कळमकर आदी उपस्थित होते.

यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले की, महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळाची राज्य सरकारने योग्य दखल घेतली आहे. केवळ अहवालावर अवलंबून न राहता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळा विषयी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री याविषयी निर्णय जाहीर करतील. दुष्काळा विषयी विशेष अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही. पुढील दीड ते दोन महिन्यात अधिवेशन होईल त्या अधिवेशनात दुष्काळ विषयावर आमदार आपल्या भावना मांडू शकतील. त्यापूर्वीच सर्व सुरळीत होईल. हे संकट नैसर्गिक आहे. काही ठिकाणी धरणे भरली आहेत, तर काही ठिकाणी पिकं करपली आहेत. शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. सरकार शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याच्या भूमिकेत आहे. सर्वच शेतकऱ्यांना वाटते की, माझे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री स्वतः शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधत आहेत. पक्षाच्या वतीने जालना, अमरावती, नागपूर येथे चारा छावण्या सुरू केल्या आहेत. प्रथम शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवून मग चारा छावण्या सुरू केल्या जातील. इतर पक्ष तसेच सामाजिक संस्थांनी देखील चारा छावणी सुरू करण्यासाठी योगदान दिले आहे असेही विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात डीजे चा वापर करण्यास प्रतिबंध आहे. याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सचिन अहिर यांनी सांगितले की, उत्सव हा उत्साहात झाला पाहिजे तसेच परंपरेचे देखील जतन झाले पाहिजे. मी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून दरवर्षी कामगारांसोबत भक्तिभावाने गणेशोत्सवात सहभाग घेतो. माझ्या कामगार संघटना देखील कोठेही डीजे न लावता पारंपारिक वाद्यांचा वापर करून गणरायाची आराधना करतात.

सचिन अहिर
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
Next Article विद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’; भारतीय जैन संघटनेच्या शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला उपक्रम
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?