Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा आणि ब्रह्मज्ञानाचा संदेश देणाऱ्या मुक्ती पर्वाचे भव्य आयोजन
पिंपरी चिंचवड

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा आणि ब्रह्मज्ञानाचा संदेश देणाऱ्या मुक्ती पर्वाचे भव्य आयोजन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
मनाच्या बंधनांतून मुक्त होणे हीच खरी मुक्ती – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज

हिंदवी न्यूज | पिंपरी 

संत निरंकारी मिशनच्या वतीने या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ब्रह्मज्ञानातून प्राप्त होणाऱ्या अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा दिव्य संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यात आला. बाह्य बंधनांतून मुक्त होणे म्हणजेच खरी मुक्ती नव्हे; अज्ञान, अहंकार आणि भेदभाव यांपासून मुक्त होऊन आत्मबोध आणि परमात्मबोधाची अनुभूती घेणे, यातच खरी मुक्ती सामावलेली आहे, हा संदेश या पर्वातून देण्यात आला.

संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे आ. सखाराम लवटे (मुंबई) यांच्या सान्निध्यात सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत विशेष सत्संग सोहळा झाला. भोसरी, चाकण, राजगुरुनगर व परिसरातील विविध भागांतून हजारो श्रद्धाळू या सोहळ्यास उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात झालेल्या सत्संगामुळे परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले होते.

सत्संगात ‘मुक्ती पर्वा’चा इतिहास, त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि सत्याच्या प्रचारासाठी जीवन समर्पित करणाऱ्या संत-महात्म्यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. ‘मुक्ती पर्व’ हा केवळ एक उत्सव नसून सत्य, सेवा, समर्पण व मानवतेच्या कार्यासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या संत विभूतींचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस असल्याचे सांगण्यात आले.

सत्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविताना अनेक संत-महात्म्यांना प्रतिकूल परिस्थिती, विविध अडचणी आणि आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, सत्यावरील श्रद्धा, सद्गुरूंच्या चरणी असलेले समर्पण, सेवा आणि मानवतेचा भाव त्यांनी अखेरपर्यंत जपला. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत प्रेम, नम्रता, श्रद्धा आणि दृढनिश्चयाने सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले.

या पावन सत्संगात श्रद्धाळू भक्तांनी मानवतेला मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर करणाऱ्या महान संत विभूतींना श्रद्धापूर्वक नमन करून श्रद्धासुमने अर्पण केली. तसेच जगभरातील मिशनच्या विविध शाखांमध्येही ‘मुक्ती पर्वा’निमित्त विशेष सत्संगाचे आयोजन करून या महान संत विभूतींचे श्रद्धापूर्वक स्मरण करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे, ‘मुक्ती पर्वा’ची सुरुवात १९६४ मध्ये जगत माता बुद्धवंती जी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ झाली. १९६९ मध्ये शहनशाह बाबा अवतार सिंह जी यांच्या ब्रह्मलीन होण्यानंतर हा दिवस ‘शहनशाह-जगत माता दिवस’ म्हणून श्रद्धापूर्वक साजरा केला जाऊ लागला. पुढे १९७९ मध्ये संत निरंकारी मंडळाचे प्रथम प्रधान संत लाभ सिंहजी यांच्या स्मृतीचाही या दिवसाशी संबंध जोडण्यात आला तदुपरांत बाबा गुरबचन सिंहजी यांनी या दिवसाला ‘मुक्ती पर्व’ म्हणून प्रतिष्ठित केले. या प्रसंगी निरंकारी राजमाताजी यांच्या भक्तिमय जीवनाचा तसेच त्यांनी दिलेल्या अमूल्य शिकवणींचाही उल्लेख करण्यात आला.

२०१८ पासून युगनिर्माता माता सविंदरजी यांनाही या प्रसंगी श्रद्धापूर्वक नमन करण्यात येते. वात्सल्य, विनम्रता, त्याग आणि निःस्वार्थ सेवेने परिपूर्ण असलेले त्यांचे जीवन श्रद्धाळू भक्तांसाठी सदैव प्रेरणा, मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत राहील. तसेच सत्गुरू माता जी यांनी हा पावन दिवस मिशन आणि मानवतेच्या सेवेसाठी तन, मन आणि जीवन निःस्वार्थ भावनेने समर्पित करणाऱ्या सर्व अनन्य भक्त आणि समर्पित सेवादारांप्रति कृतज्ञता व श्रद्धा व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम बनविले.

निःसंशय, मुक्ती पर्वाचा मूलभूत संदेश हाच आहे की, ज्या प्रकारे भौतिक स्वातंत्र्य , राष्ट्राच्या प्रगती आणि उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते, त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाची दिव्य ज्योत मानवाला आपल्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देत प्रेम, बंधुभाव आणि सद्भावनेच्या पवित्र मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देते.

संत निरंकारी मिशन
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमाजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंवर्धनाची प्रतिज्ञा
Next Article ‘वननेस वन’ उपक्रमातून संत निरंकारी मिशनचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

सायन्स पार्कमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 25, 20260
Spread the love

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?