हिंदवी न्यूज | पिंपरी
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शिर्के यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या वतीने संभाजीनगर, आकुर्डी येथे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मान्यवरांनी शिर्के यांच्या आठवणींना उजाळा दिला..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह भ प शामराव गायकवाड यांनी प्रवचन केले. याप्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांनी शिवाजीराव शिर्के, हे लेखक, कवी, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, संपादक, होते. त्यांनी विविध क्षेत्रातील आपले योगदान दिले. तसेच त्यांच्या येसूबाई या पुस्तकाची नोंद इंडिया बुक मध्ये झालेली आहे, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण,बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, अशोककुमार पगारिया, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे राजेंद्र घावटे, दिलासा संस्था आणि शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, वसुंधरा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, गुणवंत कामगार राजेश हजारे, महंमद शरीफ मुलानी, उद्योजक रामदास माने, गिर्यारोहक अरविंद वाडकर, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, गुणवंत कामगार सुदाम शिंदे, शंकर आथरे, कवी सुभाष चटणे, बी आर माडगूळकर, कवी शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, हभप अशोक महाराज गोरे, भरत शिंदे, महेंद्र गायकवाड, शरद काणेकर, शंकर नाणेकर,अण्णा गुरव, पांडुरंग सुतार, शिवराज शिंदे, नामदेव हुले या सर्व मान्यवरांनी शिवाजीराव शिर्के यांच्या आठवणी सांगत आदरांजली समर्पित केली.
याप्रसंगी शहरातील गुणवंत कामगार, साहित्यिक उपस्थित होते. हभप साखरचंद लोखंडे यांनी पसायदान म्हणून आदरांजली सभेची सांगता केली.




