Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड महापालिका»यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश
पिंपरी चिंचवड महापालिका

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 2026Updated:November 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी, दि. २५ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास महापौर रवि लांडगे यांनी आज भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयाच्या कामकाजातील त्रुटी दूर करून नागरिकांना दर्जेदार, सुलभ व तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रुग्णालयातील जीर्ण झालेल्या ऑक्सिजन वाहिन्या बदलण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. वैद्यकीय सेवा व पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रस्ताव तयार करून सादर करावेत. तसेच रुग्णालयातील रक्ताची उपलब्धता सुरळीत राहण्याच्या दृष्टीने महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर रुग्णालयाचे अद्ययावत व नागरिकाभिमुख संकेतस्थळ विकसित करणे, ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, औषधांची उपलब्धता, गुणवत्ता व नियमित पुरवठा सुनिश्चित करणे, उद्भवणाऱ्या लिफ्टविषयक अडचणींचे निराकरण करणे तसेच वाहनतळ व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याबाबतही प्रशासनाला निर्देश देण्यात आले.

रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी स्वतंत्र मदत कक्ष कार्यान्वित करणे, रुग्णालयाच्या परिसरात आवश्यक दिशादर्शक व माहिती फलक उभारणे तसेच आकस्मिक वैद्यकीय अधिकारी (CMO) यांच्या कामकाजाशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्याबाबत महापौरांनी सूचना दिल्या.

मृत व्यक्तींच्या नातेवाइकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शवगृह विभागामार्फत मृतदेहासाठी आवश्यक कापड व इतर अनुषंगिक साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबतही महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले.

महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून प्राधान्याने व कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.

याप्रसंगी नगरसेवक योगेश बहल, जितेंद्र ननावरे, वर्षा जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ycm-hospital-facilities-strengthening-mayor-ravi-landge
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामे आणि प्रस्तावांना मंजुरी
Next Article अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

November 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?