Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»कर्मवीर’ या गोत्राने मी समाजात कार्यरत! – ॲड. सतिश गोरडे
पिंपरी चिंचवड

कर्मवीर’ या गोत्राने मी समाजात कार्यरत! – ॲड. सतिश गोरडे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 2, 2026Updated:May 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी (हिंदवीन्यूज)

‘धार्मिक आणि पवित्र कार्य करताना आपण गोत्र सांगतो; पण सामाजिक कार्यात मी ‘कर्मवीर’ या गोत्राने कार्यरत आहे!’ असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ विधिज्ञ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सदस्य आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी ॲड. सतिश गोरडे यांनी रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे काढले. रयत माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष बाळासाहेब वाघिरे, माजी विद्यार्थी नगरसेवक संजोग वाघिरे, माजी विद्यार्थिनी पत्रकार अश्विनी सातव, विशाल मासुळकर, प्रशांत म्हेत्रे, ॲड देविदास कुदळे, उपप्राचार्या डाॅ. कामायनी सुर्वे, उपप्राचार्या डाॅ. संगीता अहिवळे, उपप्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. नीळकंठ डहाळे, प्रा. मनीषा शिंदे, ॲड. देविदास कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘जन्म कुणाच्याही हातात नसतो. जन्म कुठे होईल? कधी होईल? गरीब अथवा श्रीमंत घरात होईल, हे कोणीच सांगू शकत नाही; पण आपल्या कर्तृत्वाप्रमाणे आपण भरारी घेऊ शकतो. गुरुजनांचा आदर्श घेऊन समाजात चांगले कार्य करावे असे शिक्षण मिळाले. ग्रंथप्रेमातून महापुरुषांची चरित्रे वाचली. सुमारे तेहतीस वेळा हृदयविकाराचा झटका येऊनही कर्मवीर भाऊराव अण्णा हे समाजासाठी आणि शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत राहिले; तसेच माउली लक्ष्मीबाई यांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून अण्णांच्या शैक्षणिक कार्याला मदत केली, या गोष्टी मनाला खूप प्रेरणा देऊन गेल्या. त्यामुळे विधी क्षेत्रात विधिज्ञ म्हणून कार्यरत झाल्यावर गरीब कैद्यांना सोडविण्यासाठी विनामूल्य मदत केली. येरवडा कारागृहात पुरुष कैद्यांची व्यवस्था व महिला कैद्यांची व्यवस्था मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत किरकोळ गुन्हेगार, गरीब, अनाथ आणि केवळ अपघाताने गुन्हेगार ठरलेल्या चौदाशे कैद्यांना मोफत समुपदेशन करून त्यांची मुक्तता केली. भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी पंचाहत्तर मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. त्यापैकी पन्नासावे व्याख्यान माझ्याच महाविद्यालयात देताना झालेला मनस्वी आनंद अजूनही स्मरणात आहे. या माजी विद्यार्थी मेळाव्यात आपण महाविद्यालयासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सुविधायुक्त नूतन इमारतीचा संकल्प करू या. पुढील वर्षी होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या वेळी या इमारतीचे बांधकाम सुरू झाले असेल यासाठी आपण कटिबद्ध राहू या!’

प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या माजी विद्यार्थी संघाचा गौरव करताना दरवर्षी निरोप न देता १ मे रोजी सर्व माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यावेळी संजोग वाघिरे पाटील आणि बाळासाहेब वाघिरे यांनी संस्थेस देणगी सुपूर्द केली. यावेळी माजी विद्यार्थी संजय तळपदे, प्रशांत गाडेकर, विशाल मासुळकर, सुरेश झिते, सागर पाटील, ओंकार पाटील, विक्रम कांबळे, शरद गायकवाड, नवनाथ हजारे, ओंकार जाधव, अश्विनी सातव व बाळासाहेब वाघिरे यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला.

प्रतिमापूजन आणि रयतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. डॉ. कामायनी सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुहास निंबाळकर यांनी महाविद्यालयाबाबत आढावा घेतला. प्रा. डॉ. रूपाली पोखरकर आणि प्रा. काजल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थी प्रा. संजय पोकळे यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘नारी शक्ती वंदन विधेयका’ला विरोध करणाऱ्या काँग्रेस विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांचा ‘आक्रोश मोर्चा’
Next Article आदर्शांचे अनुकरण भारताला विश्वगुरू पदाला नेणारे! – डाॅ. सागर देशपांडे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?