Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»मुळशी»आदर्शांचे अनुकरण भारताला विश्वगुरू पदाला नेणारे! – डाॅ. सागर देशपांडे
मुळशी

आदर्शांचे अनुकरण भारताला विश्वगुरू पदाला नेणारे! – डाॅ. सागर देशपांडे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 2, 2026Updated:May 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प चौथे

पिंपरी (हिंदवीन्यूज)

‘भाषा, संस्कृती, अर्थकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांतील आदर्शांचा शोध घेऊन त्यांचे अनुकरण भारताला विश्वगुरू पदाला नेणारे आहे!’ असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे  केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘आदर्शांच्या शोधात’ या विषयावरील चौथे पुष्प गुंफताना डॉ. सागर देशपांडे बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे अध्यक्षस्थानी होते; तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मारुती भापकर यांनी, ‘जिजाऊ व्याख्यानमाला ही पिंपरी – चिंचवडमधील एक अग्रगण्य व्याख्यानमाला असून पस्तीस वर्षांपासून सातत्याने लोकप्रबोधनाचे कार्य करीत आहे; पण समाजाची वैचारिक दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे!’ अशी खंत व्यक्त केली. नरेंद्र पेंडसे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांना आदर्श मानले होते. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या जीवनात किमान एकतरी आदर्श शोधला पाहिजे!’ असे मत व्यक्त केले.

डॉ. सागर देशपांडे पुढे म्हणाले की, ‘समाजात केवळ दहा टक्के लोक प्रामाणिकपणे काम करतात, हे अनादि काळापासूनचे सत्य आहे. अर्थातच कोणत्याही राजकीय पक्षाला त्यासाठी पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही. ‘ज्यांचे पाय धरावेत अशी माणसे आता दिसत नाहीत’ असे पु. ल. देशपांडे विनोदाने म्हटले असले तरी आपली पूर्वग्रहदूषित दृष्टी बाजूला सारून आपल्या सभोवताली शोध घेतल्यावर अनेक आदर्श व्यक्तिमत्त्व आढळून येतात. छत्रपती शिवाजीमहाराज यांनी पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत जी काही देदीप्यमान कर्तबगारी केली आहे, ती समजून घेण्यात आपला एक जन्म अपुरा पडेल. केवळ आपल्या देशातीलच नव्हेतर जगातील असंख्य प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांनी शिवचरित्रापासून प्रेरणा घेतली आहे. आपण कृष्ण विसरलो, गीता विसरलो आणि आता छत्रपती शिवाजीमहाराजही विसरत चाललो आहोत. शिवाजीमहाराज नेपोलियनपेक्षाही महा पराक्रमी होते, ही बाब जगातील अभ्यासक नमूद करतात; पण त्यांच्या कितीतरी पटीने नेपोलियनची चरित्रे लिहिली गेली आहेत. याचे कारण आपण आपला जाज्वल्य इतिहास जाणून घेतला नाही. आपण संस्कृत भाषा विसरलो आणि आता मायबोली मराठीविषयी आपल्याला आपुलकी वाटत नाही. वास्तविक जगात पंधरा कोटी लोक मराठी बोलतात. मराठीत सातशे ज्ञानकोश आहेत. दरवर्षी सातशे दिवाळी अंक आणि तीन हजार पुस्तकं मराठीत प्रसिद्ध होतात. आपला भारत देश खंडप्राय असून बावीस राज्यघटनेतील भाषा आणि सोळाशे बोलीभाषा बोलल्या जातात. आपल्या प्रत्येक प्रथापरंपरांमागे विज्ञान आहे. आपल्या पुण्याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून संबोधण्यात येते; पण या गोष्टीचा आपल्याला स्वाभिमान वाटत नाही. माझ्या सुदैवाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांचा सहवास आणि चरित्रलेखन करण्याची संधी मला लाभली; तसेच ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचा सहवास लाभला!’ ओघवत्या अन् मार्मिक शैलीतून डाॅ. सागर देशपांडे यांनी विषयाची मांडणी केली.

ॲड. विपुल नेवाळे, महेश गावडे, अवधूत कुलकर्णी, अशोक कामेरकर यांनी संयोजन केले. सुदाम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकर्मवीर’ या गोत्राने मी समाजात कार्यरत! – ॲड. सतिश गोरडे
Next Article ज्ञानेश्वरी ही एक जीवनप्रणाली! – डाॅ. भावार्थ देखणे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा

August 23, 2026

क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न

August 22, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

आळंदीतून आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्यास पाहुणचारासह निरोप

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?