Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»मुळशी»कैदी हा समाजाचा अविभाज्य घटक! – मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक
मुळशी

कैदी हा समाजाचा अविभाज्य घटक! – मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 24, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी,(हिंदवी न्यूज)- ‘कोणतीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते तर गरिबी, बेरोजगारी, वैमनस्य, पैशाचा अथवा संपत्तीचा मोह, चुकीच्या संकल्पना यामुळे गुन्ह्यास प्रवृत्त होते. त्याचे कृत्य कायद्याच्या विरोधात असलेतरी कैदी हा समाजाचा अविभाज्य घटक आहे!’ असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले.

दर्द से हम दर्द तक, सुप्रा लीगल फाउंडेशन, मुंबई विधीसेवा प्राधिकरण या संस्थांच्या वतीने बहाई सेंटर सभागृह, मुंबई येथे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे, फौजदारी कायदा आणि विनामूल्य कायदेशीर साहाय्य क्षेत्रातील (इंटर्नशिप) प्रशिक्षण अनुभव या दिनांक १६ मे ते १३ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती श्रीराम मोडक बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पवनकुमार तापडिया, सचिव मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश साळशिंगीकर, ॲड. सुनीता खंडाळे साळशिंगीकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्रीराम मोडक पुढे म्हणाले की, ‘मी न्यायाधीश म्हणून वेगवेगळ्या न्यायालयात काम केले आहे; पण दर्द से हमदर्द तक या संस्थेने कायद्याच्या कक्षेत राहूनही गरीब, निर्दोष, निरपराध अन् परिस्थितीमुळे असाहाय्य असलेल्या कैद्यांना मोफत न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या विविध मानवतावादी उपक्रमांची माहिती मला उशिरा समजली याबाबत खेद वाटतो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत दोन वर्षे अभ्यास करून अस्तित्वात आणलेल्या राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. जोपर्यंत दोषसिद्धी होत नाही तोपर्यंत कोणालाही गुन्हेगार मानता येत नाही. आपल्या भारतात वेगवेगळ्या कारागृहात सुमारे पाच लाख कैदी आहेत. कोणालाही फक्त दोन तास एकाच ठिकाणी जखडून ठेवले तर असह्य होते, त्यामुळे या कैद्यांची मानसिक कुचंबणा आपल्या लक्षात येते. गुन्ह्याच्या आरोपानुसार कच्चा कैदी, पक्का कैदी, स्थानबद्ध आरोपी असे कैद्यांचे वर्गीकरण केले जाते. अशावेळी नातेवाईक, मित्र, राजकीय पक्ष त्या कैद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करीत असतात; परंतु काहीवेळा जामीनपात्र गुन्हा असूनही दुर्दैवाने कोणीही पाठीशी नाही अशा अभागी कैद्यांना तुरुंगात खितपत पडावे लागते. अशा कैद्यांबाबत केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत कायदेशीर साहाय्य करणाऱ्या दर्द से हमदर्द तक या संस्थेचे कार्य खरोखरच स्तुत्य आहे. वकील होण्यासाठी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण दिले जाते; मात्र प्रत्यक्षात काम करताना ते पुरेसे नाही हा अनुभव नवोदित वकिलांना येतो. या पार्श्‍वभूमीवर आरोपीची दुसरी बाजू मांडण्याचे, कैद्यांप्रति संवेदनशीलता बाळगण्याचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असते; आणि अशा उपक्रमांमुळे ते ज्ञान अन् दृष्टी प्राप्त होते!’

ॲड. आशि नारायण यांनी इंटर्नशिप प्रोग्रामबाबत सविस्तर आढावा घेतला. ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेने तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची माहिती देताना कारागृहातील कैद्यांसाठी मोफत खटला चालवण्यासाठी व जामीन देण्यासाठी केलेली मदत, विनामूल्य समुपदेशन केंद्र, कायदेशीर जागरुकता वाढविणे, गोरगरिबांसाठी वकील आपल्या दारी हा राबविलेला विनाशुल्क उपक्रम आदींची माहिती दिली.

यावेळी न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी, ॲड. सुहास पडवळ, ॲड. गणेश नागरगोजे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. भूषण पाटील, ॲड. ओंकार पाटील, ॲड. विघ्नेश्वर सुब्रह्मण्यम, ॲड. नितीन हजारे हे उपस्थित होते. ॲड. सायली वाणी यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सतिश गोरडे यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत सांगीतिक मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article ‘कृष्णायन’ या तीन दिवसीय भागवत कथनाने श्रोते मंत्रमुग्ध
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

न्यायालयातील वकील कक्षात चोऱ्यांचे सत्र ; बॅगेतील आयपॅड लंपास

October 6, 2026

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा

August 23, 2026

क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न

August 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?