हिंदवी न्यूज | आळंदी
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीतर्फे या वर्षीच्या दुष्काळाचे निवारण करण्यासाठी संस्थानच्या वतीने दुष्काळग्रस्तांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये संस्थानचे योगदान म्हणून २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
मुंबईतील मंत्रालय येथे हा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम दादा पाटील उपस्थित होते.









