हिंदवी न्यूज |
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.मुसळधार पावसामुळे आळंदी व देहू येथील मंदिर परिसर तसेच धर्मशाळांमध्ये इंद्रायणी नदीचे पाणी शिरले असून परिस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने वारकरी व भाविकांना सध्या ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबण्याचे, पुढील प्रवास न करण्याचे तसेच नदी, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या मार्गांवरून जाण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले आहे.पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतर आणि मार्ग खुले झाल्यावर पुढील प्रवासाबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
![]()
