Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»Belgav»राजयोगानेच सामाजिक समस्यांवर उपाय, स्व-दर्शन शक्य – राजयोगी बी.के. अच्युत
Belgav

राजयोगानेच सामाजिक समस्यांवर उपाय, स्व-दर्शन शक्य – राजयोगी बी.के. अच्युत

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 29, 2026Updated:September 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज |

बेळगाव: आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि संपत्तीमध्ये शिखरावर पोहोचलो असलो तरी मनाच्या शांतीच्या बाबतीत अत्यंत गरीब आहोत. सामाजिक समस्यांचे मूळ मनाच्या दुर्बलतेमध्ये आहे आणि यावर राजयोग हाच उपाय आहे, असे माउंट अबू ‘मधुबन’चे राजयोग शिक्षक बी.के. अच्युत यांनी सांगितले.

शहरातील महांतेश नगर ब्रह्मकुमारीज प्रादेशिक केंद्रात दोन दिवस चाललेल्या ‘राजयोग अनुभूती’ कार्यक्रमात रविवारी मुख्य अतिथी म्हणून बोलताना त्यांनी “राजयोगाचे महत्त्व आणि सामाजिक समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग” या विषयावर मार्गदर्शन केले.

राजयोग म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे नव्हे, तर आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंध जोडण्याची प्रक्रिया आहे. मी देह नाही, देह चालवणारी चैतन्य आत्मा आहे ही जाणीवच राजयोगाचा पहिला धडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राजयोगामुळे तणाव, राग, मत्सर, द्वेष यांसारख्या नकारात्मकतेतून मुक्ती मिळते आणि निर्णयशक्ती वाढते. आज समाजात असलेले व्यसन, हिंसा, भ्रष्टाचार, कौटुंबिक कलह यांना मनाची दुर्बलताच कारणीभूत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

“एक व्यक्ती बदलली तर घर बदलते, घर बदलले तर समाज बदलतो, समाज बदलला तर संपूर्ण विश्वच बदलते. सरकार कायदा करू शकते, पोलीस शिक्षा देऊ शकतात, पण मनाचे परिवर्तन हे स्व-दर्शनानेच होते. दिवसातून 20 मिनिटे मोबाईलपासून दूर राहून आत्मचिंतन करावे”, असा सल्ला त्यांनी दिला.

विजयपूर ब्रह्मकुमारीज सेवा केंद्राच्या राजयोगिनी बी.के. शैलजा म्हणाल्या, देहाला चालवणारी चैतन्य शक्ती म्हणजे आत्मा. या स्व-आत्मदर्शनानेच जीवनात खरी शांती आणि आनंद मिळतो. “स्व-आत्मदर्शन, चैतन्य आणि जडलेले संस्कार” हाच आपला पाया आहे.

माणूस आयुष्यभर मी कोण आहे हे बाहेर शोधत असतो. पण उत्तर आतच आहे. आत्म्यामध्ये 7 मूळ गुण आहेत – शांती, प्रेम, पवित्रता, ज्ञान, सुख, शक्ती आणि आनंद. आपण हे गुण विसरलो कीच दुःख येते, असे त्या म्हणाल्या.

जन्मापासून आतापर्यंत आपण जे पाहिले, ऐकले, अनुभवले ते सर्व आत्म्यावर संस्कार म्हणून नोंदवले जाते. रागावणे, घाबरणे, मत्सर करणे हे जन्मजात गुण नाहीत, तर जडलेले संस्कार आहेत. एका डिव्हाइसमध्ये जसे हवे तसे रेकॉर्ड करून डिलीट करता येते, तसेच राजयोगाच्या माध्यमातून जुने वाईट संस्कार पुसून नवीन दिव्य संस्कार भरता येतात, असे त्या म्हणाल्या.

दिवसातून 2 वेळा 15 मिनिटे राजयोगाचा अभ्यास केल्यास आत्मा रूपी बॅटरी चार्ज होते. मग आपल्या विचार, बोलणे आणि कर्मात बदल होतो. घरातील भांडणे, कार्यालयातील तणाव, समाजातील अशांती कमी होते. चैतन्यशील व्यक्तीकडूनच चैतन्यशील समाज निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले.

बेळगाव प्रादेशिक प्रमुख राजयोगिनी बी.के. अंबिका दीदींनी सर्वांना आशीर्वचन दिले. यावेळी बेळगाव, बागलकोट, विजयपूर सेवा केंद्रातील बंधू-भगिनी, स्थानिक नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना राजयोग ध्यानाचा अनुभव देण्यात आला. बी.के. ज्योती यांनी स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात राजयोगी शांता, मीनाक्षी, नागरत्ना, प्रतिभा, पवित्रा, संगीता, मंजुळा, ईरम्मा, महादेवी, साधना, विश्वनाथ, गुरुराज कामत, श्रीकांत, महांतेश उपस्थित होते.

Rajyogi bk achyut
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना
Next Article ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबर शेवटचा दिवस
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?