Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात टुरिस्ट बसेसमुळे निमार्ण होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे टुरिस्ट बसेस वर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यन्त बंदी घालण्यात यावी व याबाबत आवश्यक उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी युवासेना उपशहरप्रमुख कुणाल जगनाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत महापौर व महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा येथे गेल्या काही काळात टुरिस्ट बसेसची संख्या मोट्या प्रमाणात वाढली आहे, विशेष म्हणजे ह्या टुरिस्ट बसेस कुठलाही कायदा नियम पाळत नसून त्या दिवसभर शहराच्या मुख्य रस्त्यावर, तसेच अंतर्गत रस्त्यावर देखील बेशिस्तपणे धावत आहेत, शहरातील बहुतांश प्रमुख चौक, बसथांबे, उड्डाणपूल…
गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण ; गुणवंतांचा गौरव विद्यार्थ्यांची बंगालीसह विविध भाषांत मनोगते हिंदवी न्यूज |आळंदी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या तुळापूर येथील धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात, साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय महोत्सवाचे अध्यक्षस्थान तुळापूर गावच्या विद्यमान सरपंच गुंफाताई इंगळे यांनी भूषविले. प्रभात फेरीतून ‘व्यसनमुक्ती’चा संदेश ;- स्वातंत्र्य दिना निमित्त सकाळी सर्वप्रथम विद्यालयाची इमारत आणि परिसर आकर्षक रांगोळ्या, फुगे, तोरणांनी सजवण्यात आला होता. प्रथम संपूर्ण तुळापूर गावातून विद्यार्थ्यांची भव्य ‘प्रभात फेरी’ काढण्यात आली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी हातामध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता या…
संतदास उपाख्य हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विद्यार्थी चळवळीपासून पक्षाच्या व्यापक संघटनात्मक जबाबदारीपर्यंतचा प्रवास; अनेक वर्षांच्या कार्याची पक्षाकडून दखल* हिंदवी न्यूज | मुंबई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या सहा वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळणारे सुनिल विजय गव्हाणे यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात करणाऱ्या सुनिल गव्हाणे यांनी गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला. विद्यार्थी शुल्क, शिष्यवृत्ती, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, शिक्षणातील विविध प्रश्न तसेच…
हिंदवी न्यूज | पिंपरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहना- नुसार संत तुकाराम नगर मध्ये (दि.१५) रोजी भव्य तिरंगा रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, सदाशिव खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, अजीज भाई शेख आधी मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात…
खासगी वाटाघाटीद्वारे खातेदारांना मिळणार २५ टक्के अधिक मोबदला; ‘पीएमआरडीए’चा प्रकल्पासाठी पुढाकार! मुदतीत भूसंपादनास संमती न देणाऱ्या खातेदारांचे कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन हिंदवी न्यूज | पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रस्तावित ६५ मीटर रुंद ‘पुणे इनर रिंगरोड’ प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग दिला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यातील मौजे सोळू, तसेच हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे व मौजे निरगुडी या गावांमधील जमीन संपादित केली जात आहे. या गावांमधील जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने संपादित करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील मोबदल्यापोटी ‘पीएमआरडीए’ने ४४ कोटी रुपयांचा निधी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या परिसरातील भूसंपादनाचे दर निश्चित केले…
विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम हिंदवी न्यूज | पुणे भारताच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने १४ ते २१ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा दरम्यान ‘एकता, समरसता आणि राष्ट्राभिमान’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित देशभक्तिपर, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. भारताला समृद्ध, सशक्त आणि जागतिक पटलावर अग्रगण्य बनविण्याच्या ‘विकसित भारत’ या राष्ट्रव्यापी प्रवासात सूर्यदत्त शिक्षण संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने अग्रभागी राहिला आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली या सर्व उपक्रमांची आखणी करण्यात आली…
खासदार श्रीरंग बारणे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड दरम्यान सेवा रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केले जात आहे. किवळे येथे ठेकेदाराने रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार बारणे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड बायपासपासून किवळे, रावेत मार्गे वाकडपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचे काम डीएमआर इन्फ्रा या ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे.…