Author: Hindavinewsnetwork@gmail.com
पत्रकारिता लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ – उपमहापौर शर्मिला बाबर हिंदवी न्यूज | पिंपरी मराठी पत्रकार संघ, पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणी व नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभ पिंपरी चिंचवड महापालिका पत्रकार कक्षात पार पडला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर व सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश संघटक अरुण कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपमहापौर बाबर व सत्तारूढ पक्षनेते शितोळे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नगरसेवक उत्तम केंदळे उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना…
– रिंगरोड, मेट्रो मार्ग, पूररेषा ते गावहद्दीची माहिती घरबसल्या उपलब्ध. – नागरिकांचे कार्यालयातील हेलपाटे थांबणार! हिंदवी न्यूज | पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरिक, गुंतवणूकदार, विकासक, वास्तुविशारद, अभियंते आणि विविध शासकीय विभागांना नियोजनविषयक माहिती सुलभ, पारदर्शक व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘जीआयएस’ (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) आधारित सार्वजनिक पोर्टल विकसित केले आहे. या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना प्रादेशिक नियोजनाची सर्व प्राथमिक माहिती एकाच ठिकाणी आणि घरबसल्या उपलब्ध होणार आहे. या सार्वजनिक ‘जीआयएस’ पोर्टलवर ‘पीएमआरडीए’ कार्यक्षेत्राची सीमा, मंजूर प्रादेशिक योजना (आरपी), प्रस्तावित नगररचना योजना (टीपी स्कीम), गावहद्द तसेच महानगरपालिका व नगरपरिषदांच्या सीमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच एमएसआरडीसी…
हिंदवी न्यूज | पुणे अॅड. साहिल दिलावर शेख यांना केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी पुणे बार असोसिएशनकडून जाहीर निषेध करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. पोलीस उपायुक्त क्रमांक सात अबिनाश कुमार यांची पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष अॅड. राम भुजबळ साहेब, उपाध्यक्ष अॅड. कांताराम नप्ते पाटील, अॅड. प्रतापराव मोरे, सचिव अॅड. सम्राट जांभुळकर, अॅड. अभिजीत पोळ, अॅड. नेहा जांभळे, खजिनदार अॅड. अंजली बांदल, ऑडिटर अॅड. पूजा पवार, ऑडिटर अॅड. शिवराज निंबाळकर, सदस्य अॅड. उमेश मांजरे , अॅड. योगेश जैन, अॅड. स्मिता वाघमारे, अॅड. गुंजन भोसले तसेच शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष…
वकील असल्याने विशेषाधिकार नाही; कायद्यासमोर सर्व समान : न्यायालय हिंदवी न्यूज | पुणे विक्रीखत करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या दुय्यम निबंधकाला मारहाण केल्याप्रकरणातील आरोपी ॲड. योगेश कापरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. शर्मा यांच्या न्यायालयाने फेटाळला. प्रथमदर्शनी उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, तपासाची सद्यस्थिती आणि अर्जदाराची कथित भूमिका लक्षात घेता कापरे याची प्रत्यक्ष पोलीस चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, अर्जदार हा व्यवसायाने वकील असला तरी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात त्याला कोणताही विशेषाधिकार देता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कापरे याच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास,…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेस पक्षाच्या जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या बेताल वक्तव्याचा तसेच पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जे आक्षेपार्ह विधान केलेले आहे, त्वरित हटवून महाराष्ट्र राज्याच्या उप मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनात पक्षाकडून करण्यात आली. याबद्दल बोलताना शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, वास्तविक राजकारणामध्ये काम करत असताना कोणत्याही राजकीय पक्षाने महिलांविषयी नेहमी जबाबदारीने बोलले पाहिजे, आदराने वक्तव्य केले पाहिजे भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना खूप महत्त्वाचे स्थान आहे, ते कायम जपुन त्यांना मान सन्मान देणे, या गोष्टी…
हिंदवी न्यूज | पिंपळे गुरव साई चौक येथील लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रथमेश लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये येथील भाजी विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन सर्व महापुरुषांच्या जयंती दरवर्षी साजरा करीत असतात. समाजोपयोगी व समाज प्रबोधनात्मक काम करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचे मान सन्मान यावेळी करण्यात येत असतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य,शाहिरी आणि…
हिंदवी न्यूज | पिंपरी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार बांधवांनी बोपोडी येथील सेंटरला अचानक भेट देऊन आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा अनुभव घेतला. यावेळी सेंटरच्या संचालिका लक्ष्मी बहनजी यांनी पत्रकारांचे स्वागत करून विद्यालयाचा परिचय करून दिला. त्यांनी राजयोग मेडिटेशनचे महत्त्व, मन:शांती आणि सकारात्मक विचारसरणी याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश “वर्तमान समय: 10 कोटी नशामुक्त अभियान” या विषयावर जागरूकता निर्माण करणे हा होता. लक्ष्मी बहनजी यांनी व्यसनमुक्त समाजासाठी सुरू असलेल्या या अभियानाची माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व पत्रकारांकडून नशामुक्त राहण्याची प्रतिज्ञा करून घेतली. या संवादात पत्रकारांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. मेडिटेशनमुळे तणाव कमी होतो आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी माध्यमांची…
माजी नौदल अधिकारी सुदीर चौहान यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हिंदवी न्यूज | पुणे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या प्रेरणेतून, उपाध्यक्षा सौ. सुषमा एस. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एव्हीपी सौ. स्नेहल नवलखा यांच्या सहकार्याने सूर्यदत्त नॅशनल स्कूल, बावधन येथे कारगिल विजय दिन सप्ताह देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्याच्या अद्वितीय पराक्रमाला मानवंदना अर्पण करत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि सैनिकांविषयी आदरभाव जागृत करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. भारतीय जवानांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण आठवडाभर विविध देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील…
हिंदवी न्यूज | पिंपरी आज शिक्षणविश्वावर शोककळा पसरली आहे. एक युग संपले आहे. ज्ञान, संस्कार, दूरदृष्टी आणि मानवतेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे एक थोर शिक्षणमहर्षी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) वयाच्या ९१ व्या वर्षी मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी ११ वा. अनंतात विलीन झाले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ शैक्षणिक संस्था उभारल्या नाहीत, तर असंख्य विद्यार्थ्यांची स्वप्ने घडवली, मूल्यांची जोपासना केली आणि शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविले. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, साधेपणा, मानवतावादी दृष्टिकोन व शिक्षणाप्रती असलेली अखंड निष्ठा भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे…
शहरातील पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक हिंदवी न्यूज | पिंपरी पवना धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के भरले असतानाही पिंपरी-चिंचवड शहरावर १५ टक्के पाणी कपात कशासाठी लादली जात आहे. ही कपात तात्काळ रद्द करून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विश्वजीत बारणे म्हणाले, पवना धरणातील जलसाठा मुबलक असून पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरासाठी भविष्यात पाण्याची कोणतीही टंचाई नसतानाही पालिका प्रशासनाकडून १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील लाखो नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांस मनस्ताप सहन करावा लागत…