Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी रावेत ( पुणे) येथील राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक, अध्यात्मिक ग्रंथांचे लेखक, महाराष्ट्रातील संतपरंपरेवर विपुल लेखन करणारे अभंग चरित्रकार, कथाकार, कादंबरीकार, कवी तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शुभांगीताई काळभोर यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, या नियुक्तीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार आहे. सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत परिषदेने प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्यावर…
हिंदवी न्यूज | पिंपरी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वल्लभनगर एस.टी. स्थानक प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, हरित विकास आणि वृक्षसंवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. ते म्हणाले, “आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान लक्षात घेता वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक…
हिंदवी न्यूज | पिंपरी ‘वकिलांनी देशभक्त चित्तरंजन दास यांची भूमिका अंगीकारून न्यायासाठी लढावे!’ असे आवाहन केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बहाई सेंटर, कोर्ट चेंबर, चर्चगेट, मुंबई येथे व्यक्त केले. दर्द से हमदर्द तक ट्रस्ट, सुप्रा लीगल फाउंडेशन आणि रिनोव्हेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जस्टिस फॉरवर्ड २०२६’ या विशेष परिषदेत मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना अर्जुन राम मेघवाल बोलत होते. महाराष्ट्र राज्य कॅबिनेट कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, भारत सरकारचे डेप्युटी साॅलिसिटर जनरल ॲड. प्रवीण फलदेसाई, ॲडिशनल जनरल ॲड. अनिल सिंग, दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे सचिव ॲड. प्रकाश साळसिंगीकर, सुप्रा लीगल फाउंडेशनच्या संचालिका ॲड. सुनीता खंडाळे…
पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर व सन्मान सोहळा हिंदवी न्यूज | पिंपरी ‘कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते. त्यांची कविता मानव मुक्तीची कविता आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. पिंपरी – चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर अध्यक्षस्थानी होते; तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब,…
हिंदवी न्यूज | पिंपरी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने 720 पैकी 670 गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) 498 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून, तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण सीबीएसई बोर्डातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तिने 97.6 टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित केल्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी शिस्तबद्ध पद्धतीने केली. यशाचे श्रेय देताना अतुल्या म्हणाली, “नियमित वर्गांना उपस्थित राहणे, रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे आणि कोणताही बॅकलॉग न ठेवणे, या सवयी…
हिंदवी न्यूज | पिंपरी कन्व्हेअन्स डीडची जबाबदारी टाळत केवळ मसुदा सोसायटीकडे पाठवून कर्तव्य पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या बिल्डरला महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) चांगलाच दणका दिला आहे. किवळे येथील निर्माण माईलस्टोन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या तक्रारीवर सुनावणी करत महारेराने बिल्डर निर्माण व्हेंचरला ३० दिवसांत कन्व्हेअन्स डीडचा मसुदा अंतिम करून पुढील ३० दिवसांत सोसायटीच्या नावे दस्ताची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. किवळे येथील निर्माण माईलस्टोन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने ॲड. अजित बोराडे यांच्यामार्फत महारेराकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात महारेराचे सदस्य महेश पाठक यांनी १५ जुलै २०२६ रोजी आदेश पारित केला. मात्र रेरा कायद्याच्या कलम १७ नुसार सोसायटीच्या नावे कन्व्हेअन्स करणे…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना, तसेच महापालिका हद्दीतील शासनमान्य खासगी शाळा व महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना घर ते शाळा व शाळा ते घर अशा स्वरूपाचा बसचा मोफत पास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच शासनमान्य खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी बसपासच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम चलनाद्वारे महानगरपालिका कोषागारात भरून ते चलन अर्जासोबत पीएमपीएमएलकडे सादर केल्यानंतर बसपास देण्यात येणार आहे, यास महापालिका सभेने मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५ टक्के उपस्थिती पूर्ण केलेली असावी. विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेचे अंतर किमान २ कि.मी. किंवा…
हिंदवी न्यूज | पिंपरी आषाढी वारी पालखी सोहळानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीतून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर येथे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने भव्य वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्त्या शायना एनसी व श्रीमती श्रेया योगेश कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकरी बंधू-भगिनींचे पुष्पवृष्टी, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या अखंड गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी शायना एनसी आणि श्रेया कदम यांनी वारकऱ्यांसमवेत पायी चालत दिंड्यांमध्ये सहभाग नोंदविला. त्यांनी वारकरी बंधू-भगिनींमध्ये मिसळून त्यांच्या वारीतील अनुभव, प्रवासातील अडचणी,…
स्वच्छता, डास प्रतिबंधावर विशेष भर; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हिंदवी न्यूज | पिंपरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व इतर संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महा पालिकेकडून शहरभर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता, जनजागृती आणि डास नियंत्रणाच्या विविध मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. पावसाळ्यात साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर तसेच दूषित अन्न व पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरणे तसेच अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाण्याच्या टाक्या,…
मोशी कचरा डेपो दुर्घटनेची एसआयटी चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी हिंदवी न्यूज | पिंपरी मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी संपूर्ण घटनेची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम यांनी केली आहे. प्रविण कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ८ तारखेला दुपारी एकच्या सुमारास कचऱ्याचा ढिगारा कोसळून दुर्घटना घडली असताना बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले नाही. त्याआधी दोन दिवस कचरा कोसळत असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. दुर्घटनेनंतर…