Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी येथे काल (१२ ऑगस्ट २०२६) सायंकाळी माजी राज्यपाल आणि डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा)(ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून पाटील परिवाराचे सांत्वन केले व दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) दादांच्या निधनाने शिक्षणविश्वावर तीव्र शोककळा पसरली असून, एका महान युगाचा अंत झाला आहे. ज्ञान, संस्कार, दूरदृष्टी आणि मानवतेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे एक थोर शिक्षणमहर्षी म्हणून दादा ओळखले जात. वयाच्या ९० व्या वर्षी…
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; नाना काटे यांचे आयुक्तांना निवेदन. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
हिंदवी न्यूज | पिंपरी शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्याकडून नागरिक, महिला व लहान मुलांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांकडून नागरिक, महिला तसेच लहान मुलांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच चिखली परिसरात एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी एकत्रितपणे हल्ला केल्याची गंभीर…
हिंदवी न्यूज | पुणे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर मार्गेच व्हावी, त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी नवीन रेल्वे कॉरिडॉर व्हावा व चाकण विमानतळाच्या जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल व्हावे अशा विविध मागण्यांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न मांडले होते. त्यापाठोपाठ त्यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर मार्गेच व्हावी यासाठी झालेल्या जनआंदोलनाची माहिती दिली. अनेक ठिकाणी प्रकल्पांना विरोध होत असताना हा प्रकल्प व्हावा यासाठी आंदोलन होत…
स्वायत्ततेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; हिंदवी न्यूज | पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) या अग्रगण्य संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) कडून स्वायत्त (Autonomous) दर्जा प्रदान करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या पत्र क्र. F.2-10/2023 (AC-Policy), २०२६ अन्वये हा दर्जा मंजूर करण्यात आला असून, संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता, नवोपक्रम, संशोधन आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या दिशेने वाटचालीतील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. SIMMC मध्ये MBA, MCA, BBA आणि BCA हे अभ्यासक्रम उपलब्ध असून, उद्योगाभिमुख कौशल्ये, नेतृत्वगुण, संशोधनवृत्ती…
सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये सिद्धी जोहरींचे प्रेरणादायी भाषण; विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि यशाचा संदेश हिंदवी न्यूज | पुणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच आत्मविश्वास, सकारात्मक विचार, नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी देण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनमध्ये विविध प्रेरणादायी व व्यक्तिमत्त्व विकासपर उपक्रम सातत्याने राबविले जातात. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दूरदृष्टीतून आणि उपाध्यक्षा व सचिव सौ. सुषमा एस. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि जीवनमूल्यांची जोड दिली जाते. याच उद्देशाच्या अनुषंगाने सूर्यदत्तच्या बावधन परिसरातील बन्सीरत्न सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमात ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’,…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघातील विकासकामांचा बारावा वार्षिक अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना सादर केला. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध प्रलंबित व पूर्ण झालेल्या विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. हा अहवाल ई-बुकमध्ये तयार करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करावा. सोशल मीडियाच्या वापराचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार बारणे यांना दिला. खासदार श्रीरंग बारणे यांची ही तिसरी टर्म आहे. खासदार बारणे वर्षभरात केलेल्या कामांचा अहवाल दरवर्षी काढतात. तिसऱ्या टर्ममधील दुसरा आणि आतापर्यंतचा बारावा अहवाल आहे. हा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. अहवाल स्वीकारताना पंतप्रधानांनी दरवर्षी अहवाल प्रसिद्ध…
हिंदवी न्यूज | आळंदी आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात सोहळा आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत राज्यात पायी वारी सोहळा साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट, गोपाळपुर काला उरकून श्रींच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक भाविकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा शनिवारी ( दि. 8 ) अलंकापुरीत पोहचला. परंपरेने आज (रविवार दि. 9 ) आळंदीत कामिका एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश…
ज्योतिबा मंदिरात चातुर्मासनिमित्त विविध कार्यक्रम हिंदवी न्यूज|आळंदी आळंदी परिसरातील विविध मंदिरांत तसेच तळवडे येथील ज्योतिबा नगर मधील ज्योतिबा मंदिरात चातुर्मासनिमित्त भाविक साधकांना कार्तिकी एकादशीपर्यंत धार्मिक पर्वणीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती श्रींचे पुजारी नवनाथ भालेकर यांनी दिली. ज्योतिबा नगर तळवडे ज्योतिबा मंदिरात दर महिन्याला गुरूचरीत्र, नवनाथ भक्तीसार, केदार विजय पारायण होते. दर रविवारी अन्नदान, आरती, शिवलीला साखळी पारायण कायम सुरु असते. गेल्या 42 वर्षाहून अधिक काळ श्रींचे मुख्य पुजारी म्हणून नवनाथ महाराज भालेकर आपली सेवा अखंड रुजू करत आहेत. चातुर्मास पर्वणीत देव घरासमोर 33 गोपद्म रांगोळीने काढणे, यास गोपद्म व्रत असे म्हणतात. भगवान श्री स्वामी समर्थ व ज्योतिबा महाराज, श्रीमहाविष्णुंची…
हिंदवी न्यूज | पिंपरी पुणे येथे पार पडलेल्या ४५ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर करत चिंचवड येथील कु. नारायणी किरण योगेश माळी हिने ८ ते १० या सब-ज्युनिअर गटात सुवर्णपदकासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या जोरावर जयपूर,राजस्थान येथे आयोजित केलेल्या ५१ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल नारायणीचे सर्वत्र कौतुक होत असून तिचे पालक योगेश माळी व किरण माळी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नारायणी हिने मेहनत आणि सातत्य पूर्ण सरावाच्या जोरावर यश संपादन केल्याची भावना आई किरण माळी यांनी व्यक्त केल्या .