Author: Hindavinewsnetwork@gmail.com
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यान्वित यंत्रणा बैठक पार्किंगसाठी मोकळ्या जागांचा वापर; अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई, वाहतूक व्यवस्थेसाठी १०० एमएसएफ जवानांची नियुक्ती हिंदवी न्यूज | पुणे चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर विविध शासकीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट कालमर्यादा व जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पीएमआरडीए, एम. आय.डी.सी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद,…
हिंदवी न्यूज | पिंपरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तींचा “उद्धव श्री पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या “उद्धव श्री पुरस्कार २०२६” चे वितरण राज्यसभा खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनी प्रसिद्धीस दिली आहे. शुक्रवारी (सायंकाळी ४ वाजता), ताथवडे बीआरटी रोड येथील सुखवाणी फार्म, नरसिंह मंदिराजवळ येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपनेत्या विशाखाताई राऊत, महाराष्ट्र संघटिका…
शिवसेनेच्या वतीने भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन – सुलभा उबाळे हिंदवी न्यूज | पिंपरी मावळ लोकसभेचे संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ( दि. ३० ऑगस्ट) सकाळी ९ वाजता, चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे याचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, समन्वयक किरण राहणे, दीपक पवार आदी उपस्थित होते.या रोजगार मेळाव्यात बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी यांसह विविध उद्योग क्षेत्रांतील कंपन्या व उद्योग प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी…
हिंदवी न्यूज | पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ०८:३० वाजता साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. शहराध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही मानणारा देश आहे. भारत देशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना व विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याऱ्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी शहर कार्यकारिणीमध्ये भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष अकबर मुल्ला, सरचिटणीस पदी…
हिंदवी न्यूज | पिंपरी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ‘विभाजन विभिषिका दिन’ म्हणजे ‘अखंड भारताची फाळणी-विभाजन दिवस’ हा भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरीत एका भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मूक मोर्चात सिंधी समाज बांधव आणि हिंदू समाज बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. पिंपरी येथील डिलक्स चौक येथून या मोर्चाची सुरुवात झाली. हा मूक मोर्चा शगुन चौक आणि साई चौक मार्फत पुढे जात बी. टी. अडवाणी धर्मशाळा येथे येऊन संपन्न झाला, जिथे या मोर्चाचा समारोप करण्यात…
शहरात ‘विभाजन विभिषिका दिन’ निमित्त विशेष सभा; कलम ३७० रद्द केल्यामुळे पंडित नेहरूंच्या निर्णयाला मिळाला पूर्ण विराम हिंदवी न्यूज | पिंपरी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी येथील बी. टी. अडवाणी धर्मशाळेत ‘विभाजन विभीर्षिका दिन’निमित्त एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून पाळल्या गेलेल्या या सभेसाठी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. हेमदेव थापर उपस्थित होते. सभेला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्नबापू काटे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, हर घर तिरंगा अभियानाचे प्रदेश सहसंयोजक अनुप मोरे, हर घर तिरंगा अभियानाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर…
हिंदवी न्यूज | आळंदी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त स्वराज ग्रुपच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी ज्ञानदर्शन धर्मशाळा, आळंदी देवाची येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराचे उद्घाटन आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके साहेब यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक व माजी तालुका प्रमुख उत्तमदादा गोगावले, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, विद्यमान नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाताताई तापकीर, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेवक सागर कुऱ्हाडे, गोविंद कुऱ्हाडे, दिनेश घुले, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, सुधीरभाऊ मुंगसे,तसेच पिंपरी-चिंचवड…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सह शहर अभियंता (स्थापत्य) मनोज मोतीलाल सेठिया यांना ‘शहर अभियंता’ पदावर सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे. महापालिका आस्थापनेवरील ‘शहर अभियंता’ पद दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रिक्त झाले होते. या पदावरील पदोन्नतीसाठी दिनांक १८ जून २०२६ रोजी पदोन्नती समितीची सभा घेण्यात आली. समितीने शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, मत्ता व दायित्व तसेच शिस्तभंगविषयक बाबींची पडताळणी करून सेठिया यांच्या पदोन्नतीची शिफारस केली. महापालिका सभा ठराव क्र. ४४, दिनांक २७ जानेवारी २०२६ अन्वयेही त्यांच्या पदोन्नतीस मान्यता…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार, शहरातील एकूण २,२४७ खड्ड्यांपैकी १,७३३ खड्डे बुजविण्यात आले असून ५१४ खड्डे बुजविणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण ७७.१३ टक्के खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रभागनिहाय पाहता, अ प्रभागातील १४० पैकी १२१, ब प्रभागातील १०९ पैकी ८०, क प्रभागातील १४१ पैकी १२४, ड प्रभागातील २३४ पैकी २१५, इ प्रभागातील ४५९ पैकी ३३०, फ प्रभागातील १५१ पैकी १०९, ग प्रभागातील २५९ पैकी १७०, ह प्रभागातील ११८ पैकी ८७, ज प्रभागातील ५६ पैकी ५१ आणि त प्रभागातील ३३२ पैकी ३०५ खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच शहरी दळणवळण विभागातील २४०…
चौघडा वादक रमेश पाचंगे यांचा गौरव हिंदवी न्यूज | पिंपरी पारंपरिक चौघडा वादनाच्या सुरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दापोडी येथील प्रसिद्ध चौघडा वादक रमेश पाचंगे यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. चौघड्याच्या पारंपरिक तालाला आधुनिक व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देत पाचंगे यांनी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यांच्या प्रभावी चौघडा वादनाने देश-विदेशातील रसिकांची दाद मिळवली असून, त्यांच्या कलाप्रवासाची विविध पुरस्कारांनीही दखल घेण्यात आली आहे. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, चौघडा वादन ही केवळ कला नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा ठेवा आहे. ही कला सातासमुद्रापार पोहोचविण्याचे…