Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदासाठी प्रत्येक प्रभागातून एकच उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाल्याने सर्व प्रभाग समिती सभापती पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (भा.प्र.से.) प्रजित नायर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. या निवडणूक प्रक्रियेचे नगरसचिव उल्हास जगताप, मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रभाग अधिकारी निवेदिता घार्गे, गोरक्षनाथ लिमण, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पूजा दूधनाळे, डी.डी.कांबळे, संतोष कोराड तसेच नगरसचिव…
विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर माउली, जगद्गुरू तुकोबाराय आणि संतांनी आपल्या साहित्यातून वारीच्या काळात योग्य आहारविहार कसा असावा याचे मार्गदर्शन केले आहे!’ असे विचार महाराष्ट्र राज्य सकळ संत विचार समितीचे अध्यक्ष ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर यांनी सावरकर मंडळ सभागृह, प्राधिकरण निगडी येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि पिंपरी – चिंचवड जिल्हा आयोजित श्रीक्षेत्र चिंचवड ते श्रीक्षेत्र पंढरपूर दरम्यानच्या आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याच्या शुभारंभाचे उद्घाटन करताना ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे बोलत होते. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे,…
हिंदवी न्यूज |पिंपरी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ नेहरूनगर, पिंपरी येथील न्यायालयातील सभागृहात (बार रूम) पार पडला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज,माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. एस बी चांडक, ॲड. सुहास पडवळ, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. जे के काळभोर, ॲड. आतिश लांडगे, ॲड. राजेश पुणेकर आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. साधना बोरकर यांचा ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. गौरव वाळुंज, ॲड. सतिश गोरडे…
हिंदवी न्यूज | पिंपरी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदाही पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गेल्या सहा वर्षांपासून “पिंपरी चिंचवडकर साहित्यिकांची दिंडी” आध्यात्मिक विचारांचा प्रसार करत पालखी सोहळ्यात सहभागी होत असून, यंदा “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” या संतवचनातून “झाडे लावा, झाडे जगवा” हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा जागर हाती संदेशफलक घेऊन करण्यात आला. शहरातील साहित्यिकांनी अभंग, गवळणी आणि हरिनामाचा गजर करत तसेच पारंपरिक वेशभूषेत, हाती टाळ घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेतील ह.भ.प. प्रकाश घोरपडे यांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची महापौर रवि लांडगे यांनी मेडिकव्हर हॉस्पिटल तसेच साईनाथ हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महापौरांनी जखमी नागरिकांशी तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. या कठीण प्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिका त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भेटीदरम्यान साईनाथ हॉस्पिटलचे प्रमुख व नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, महापालिकेतील संबंधित अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेण्यात आली. जखमींना सर्वोत्तम दर्जाचे व तातडीचे वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात कोणत्याही…
हिंदवी न्यूज | पिंपरी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बहिरू बच्चे यांची भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांनी मध्यवर्ती पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये मधुकर बच्चे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कार्यालय प्रमुख संजय परळीकर, मनोज ब्राह्मणकर, विशाल वाळुंजकर, अजय पाताडे संतोष तापकीर, प्रदीप बेंद्रे, जोशना कलाटे, मनीष पंजाबी, हर्षदा मोरे,राजश्री शहा,…
हिंदवी न्यूज | देहू महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गटाच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त देहू ते आकुर्डी कामगार प्रबोधन दिंडी उत्साहात पार पडली. विविध आस्थापनांतील कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच सेवानिवृत्त कामगारांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी साकारलेली भगवान विठ्ठलाची वेशभूषा, व ह.भ.प. शामराव गायकवाड महाराज यांनी साकारलेली संत तुकाराम महाराजांची वेशभूषा. यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले, “आम्हा दोघांना साक्षात पांडुरंग आणि संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत पाहून अनेक भाविक ‘माऊली’ म्हणत दर्शन घेत होते. आम्हालाही वारकरी भक्तांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. आमच्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना आहे.” गेल्या दोन…
हिंदवी न्यूज | पिंपरी आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आळंदी ते बोपखेल पर्यंतच्या पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि राजपिता रमित जी यांच्या प्रेरणेने आणि “स्वच्छता ही सेवा” या मानवकल्याणाच्या संदेशाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात मिशनचे शेकडो सेवादल , स्वयंसेवक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. पालखी मार्गावरील रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, बसथांबे तसेच परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली. भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व आनंददायी वातावरण उपलब्ध व्हावे, तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा हा…
जिल्हा न्यायाधीशांसह मान्यवरांची उपस्थिती हिंदवी न्यूज | पुणे पुणे बार असोसिएशनच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष काळुराम बबन भुजबळ यांना दोन्ही रथांचा मान देण्यात आला. यावेळी पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते. पुणे बार असोसिएशनतर्फे वारकर्यांसाठी कायदेशीर शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश अरविंद वानखेडे, न्यायाधीश लाडेकर, न्यायाधीश कंठाळे व इतर न्यायाधीश उपस्थित होते. पालखी सोहळ्यात जिल्हा न्यायाधीश, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी व वकील बंधू भगिनीच्या हस्ते वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडूचे वाटप करण्यात आले.…
हिंदवी न्यूज | पिंपरी इंदिरानगर येथील SRA पुनर्वसन प्रकल्पामध्ये पात्र झोपडीधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत स्थानिक झोपडीधारकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ दिला जात असल्याचा आरोप करतइंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्थेच्या वतीने ॲड. अजित बोराडे यांच्या मार्फत SRA प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. इंदिरानगर परिसरातील अनेक कुटुंबे गेली ३५ ते ४० वर्षे वास्तव्यास आहेत. मात्र पुनर्वसन योजनेच्या पात्रता यादीत अनेक खऱ्या व पात्र झोपडीधारकांची नावे वगळण्यात आली असून काही अपात्र व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. पात्रता निश्चिती आणि सर्वेक्षण…