Author: Hindavinewsnetwork@gmail.com

हिंदवी न्यूज | पिंपरी  पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त “प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे,  याचे सर्व नागरिकांनी अनुकरण करून शहर स्वच्छतेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ज्येष्ठ नेते योगेश बहल यांनी केले. आपले शहर प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असावे यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे योगेश बहल यांनी सांगितले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त ‘प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक’ उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी पिंपरी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्ष प्रवक्ते अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे,…

Read More

भविष्यातील लोकसंख्या वाढीचा विचार करून सक्षम नियोजन करण्याचे निर्देश हिंदवी न्यूज | पिंपरी “स्वच्छ शहर, सक्षम नियोजन आणि पर्यावरणपूरक भविष्य – हीच आपली दिशा!” या धोरणाला प्रत्यक्षात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जोरदार पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी काळेवाडी येथील एम.एम. कॉलेज जवळील कचरा संकलन केंद्राला थेट भेट दिली आणि तेथील संपूर्ण कामकाजाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान सभापतींनी कचरा व्यवस्थापनाच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती घेतली. शहरातून गोळा होणारा ओला व सुका कचरा कशा पद्धतीने गोळा केला जातो, केंद्रावर त्याचे वर्गीकरण कसे होते आणि त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट कशी लावली जाते,…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  भौतिक चंगळवादाच्या अतिरेकामुळे मानवी जीवनात सर्वत्र तीव्र स्पर्धा, अहमहमिका, सत्तासंघर्ष वाढीस लागलेला दिसतो आहे. त्याची परिणती तिसऱ्या महायुद्धात होईल की काय या आशंकेने मानवजात भयभीत झालेली दिसते. या पार्श्‍वभूमीवर तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश पुन्हा आचरणात आणल्याशिवाय शोकमुक्त, भयमुक्त आणि बंधमुक्त समाजाची उभारणी करणे शक्य होणार नाही. तथागतांनी उपदेश केलेले हे पंचशील तत्त्वज्ञान सुत्तपिटक, विनयपिटक आणि अधिधम्मपिटक या तीन संग्रहातून अर्थातच ‘त्रिपिटक’ या काव्यात्मक धम्मपदात समाविष्ट करण्यात आले असून जगातील प्राचीन भाषांपैकी एक असा लौकिक असलेल्या पाली भाषेत ते आहे. साहजिकच बौद्ध काळापासून ते आजतागायत जगातील अनेक विद्वानांना ते साद घालत असते.…

Read More

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावावा यासाठी जनजागृती सुरू – कुणाल साठे हिंदवी न्यूज | पिंपरी जंजीरा किल्ल्यावर सरकारने सन्मानाने भगवा झेंडा लावावा त्याची कायम रक्षण, देखभाल करण्याची जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने घेण्यात येईल. तसेच पुढील तीन महिन्यात येथे भगवा झेंडा सरकारने लावला पाहिजे, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या कडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारने तीन महिन्यात परवानगी द्यावी अन्यथा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी दिला. सोमवारी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते…

Read More

पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे आवाहन ​हिंदवी न्यूज | पिंपरी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कासारवाडी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची महाबैठक पार पडली. बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि आगामी रक्तदान शिबिराच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करत ही दोन्ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ​बैठकीत मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर मतदार नोंदणीच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली. पिंपरी-चिंचवड शहरासाठी किमान ७५,००० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केले असून, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करणे अनिवार्य…

Read More

हिंदवी  न्यूज | पुणे लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवत ४२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी प्रतीक बाबूलाल मुंद्रा याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुचेता टाकळीकर यांनी हा आदेश दिला. मुंद्रा विरोधात प्रथमदर्शीनी पुरावा उपलब्ध असून त्याविरूध्द यास्वरुपाचा आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याने त्याच्याकडून पुन्हा गुन्हा करण्याची तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर येरवडा कारागृहात असलेल्या त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यास सरकार पक्षासह पिडीतेतर्फे अॅड. मुकुंद महिंद्रकर यांनी विरोध केला. आरोपी हा विवाहित आहे. फिर्यादीशी लग्नाचे आश्वासन देऊन संबंध ठेवणे आणि त्यानंतर मोठी रक्कम स्वीकारून लग्नास नकार देणे, ही…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  मा. महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष  जिल्हा विधी  सेवा प्राधिकरण, पुणे श्री. ए. टी. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18 जुलै 2026 रोजी परक्राम्य लिखत अधिनियम, 1881 (Negotiable Instruments Act, 1881) च्या कलम 138 अंतर्गत दाखल प्रकरणांच्या तडजोडीकरिता विशेष लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय, पुणे येथे करण्यात आले. या विशेष लोक अदालतीसाठी एकूण 15 लोकअदालती पॅनल (Benches) स्थापन करण्यात आली होती. या विशेष लोक अदालती मध्ये प्रलंबित 3,742 प्रकरणे सुनावणीस घेण्यात आली. त्यापैकी 201 प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधील एकूण दावा रक्कम …

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  रावेत ( पुणे) येथील राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक, अध्यात्मिक ग्रंथांचे लेखक, महाराष्ट्रातील संतपरंपरेवर विपुल लेखन करणारे अभंग चरित्रकार, कथाकार, कादंबरीकार, कवी तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शुभांगीताई काळभोर यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, या नियुक्तीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार आहे. सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत परिषदेने प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्यावर…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वल्लभनगर एस.टी. स्थानक प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, हरित विकास आणि वृक्षसंवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. ते म्हणाले, “आज लावलेले प्रत्येक झाड हे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान लक्षात घेता वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  ‘वकिलांनी देशभक्त चित्तरंजन दास यांची भूमिका अंगीकारून न्यायासाठी लढावे!’ असे आवाहन केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बहाई सेंटर, कोर्ट चेंबर, चर्चगेट, मुंबई येथे  व्यक्त केले. दर्द से हमदर्द तक ट्रस्ट, सुप्रा लीगल फाउंडेशन आणि रिनोव्हेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जस्टिस फॉरवर्ड २०२६’ या विशेष परिषदेत मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना अर्जुन राम मेघवाल बोलत होते. महाराष्ट्र राज्य कॅबिनेट कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, भारत सरकारचे डेप्युटी साॅलिसिटर जनरल ॲड. प्रवीण फलदेसाई, ॲडिशनल जनरल ॲड. अनिल सिंग, दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे सचिव ॲड. प्रकाश साळसिंगीकर, सुप्रा लीगल फाउंडेशनच्या संचालिका ॲड. सुनीता खंडाळे…

Read More