Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर व सन्मान सोहळा हिंदवी न्यूज | पिंपरी ‘कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते. त्यांची कविता मानव मुक्तीची कविता आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे  काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. पिंपरी – चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर अध्यक्षस्थानी होते; तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब,…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने 720 पैकी 670 गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) 498 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून, तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण सीबीएसई बोर्डातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तिने 97.6 टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित केल्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी शिस्तबद्ध पद्धतीने केली. यशाचे श्रेय देताना अतुल्या म्हणाली, “नियमित वर्गांना उपस्थित राहणे, रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे आणि कोणताही बॅकलॉग न ठेवणे, या सवयी…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी कन्व्हेअन्स डीडची जबाबदारी टाळत केवळ मसुदा सोसायटीकडे पाठवून कर्तव्य पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या बिल्डरला महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) चांगलाच दणका दिला आहे. किवळे येथील निर्माण माईलस्टोन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या तक्रारीवर सुनावणी करत महारेराने बिल्डर निर्माण व्हेंचरला ३० दिवसांत कन्व्हेअन्स डीडचा मसुदा अंतिम करून पुढील ३० दिवसांत सोसायटीच्या नावे दस्ताची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. किवळे येथील निर्माण माईलस्टोन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने ॲड. अजित बोराडे यांच्यामार्फत महारेराकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात महारेराचे सदस्य महेश पाठक यांनी १५ जुलै २०२६ रोजी आदेश पारित केला. मात्र रेरा कायद्याच्या कलम १७ नुसार सोसायटीच्या नावे कन्व्हेअन्स करणे…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना, तसेच महापालिका हद्दीतील शासनमान्य खासगी शाळा व महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना घर ते शाळा व शाळा ते घर अशा स्वरूपाचा बसचा मोफत पास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच शासनमान्य खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी बसपासच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम चलनाद्वारे महानगरपालिका कोषागारात भरून ते चलन अर्जासोबत पीएमपीएमएलकडे सादर केल्यानंतर बसपास देण्यात येणार आहे, यास महापालिका सभेने मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५ टक्के उपस्थिती पूर्ण केलेली असावी. विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेचे अंतर किमान २ कि.मी. किंवा…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी आषाढी वारी पालखी सोहळानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीतून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर येथे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने भव्य वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्त्या शायना एनसी व श्रीमती श्रेया योगेश कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकरी बंधू-भगिनींचे पुष्पवृष्टी, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या अखंड गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी शायना एनसी आणि श्रेया कदम यांनी  वारकऱ्यांसमवेत पायी चालत दिंड्यांमध्ये सहभाग नोंदविला. त्यांनी वारकरी बंधू-भगिनींमध्ये मिसळून त्यांच्या वारीतील अनुभव, प्रवासातील अडचणी,…

Read More

स्वच्छता, डास प्रतिबंधावर विशेष भर; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हिंदवी न्यूज | पिंपरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व इतर संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महा पालिकेकडून शहरभर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता, जनजागृती आणि डास नियंत्रणाच्या विविध मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. पावसाळ्यात साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर तसेच दूषित अन्न व पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरणे तसेच अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाण्याच्या टाक्या,…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटनेची एसआयटी चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी हिंदवी न्यूज | पिंपरी मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी संपूर्ण घटनेची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम यांनी केली आहे. प्रविण कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ८ तारखेला दुपारी एकच्या सुमारास कचऱ्याचा ढिगारा कोसळून दुर्घटना घडली असताना बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले नाही. त्याआधी दोन दिवस कचरा कोसळत असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. दुर्घटनेनंतर…

Read More

मोशी दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची सुषमा अंधारे यांनी घेतली भेट हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथे असलेल्या कचरा डेपोमध्ये बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी कचऱ्याचा डोंगर कोसळून येथील अनधिकृत इमारतीखाली चिरडून ९ कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविणाऱ्या अँटनी लारा या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सक्षम मदत द्यावी. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. चिंचवड येथे पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवसेना शहर…

Read More

कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा. हिंदवी न्यूज | पिंपरी शहरातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तसेच मृतांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे  पत्रकार परिषदेत केली. यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, महापालिका नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते; मात्र कचरा संकलन, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारखी कायमस्वरूपी स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने करून मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. काही ठेकेदार, दलाल आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जातींमध्ये लोकसंख्येनुसार ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या मागणीसाठी लोकनेते युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.१३) आंदोलन करण्यात आले. यावेळी मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना दाखले म्हणाले की, मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या विविध संघटनेच्या माध्यमातून लोकसंख्येनुसार अनेक वर्षांपासून शंकरभाऊ तालिके यांच्या नेतृत्वाखाली उप-वर्गीकरणाची  सातत्याने मागणी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी ही महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व पोटजातींना न्याय मिळावा म्हणून उप-वर्गीकरणाची गरज असल्याचा निकाल दिला आहे. पंजाब, तमिळनाडूसह इतर काही…

Read More