Author: Hindavinewsnetwork@gmail.com

साक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम – महापौर रवि लांडगे हिंदवी न्यूज|पिंपरी केंद्र शासनाच्या उल्लास–नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा ‘साक्षरतेची वारी, शिक्षणाचा संदेश’ हा जनजागृतीपर चित्ररथ सहभागी होत आहे.हा चित्ररथ आकुर्डी ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचा संदेश पोहोचविणार असून, शिक्षण विभागाचे १० कर्मचारी संपूर्ण पालखी सोहळ्यात सहभागी होऊन साक्षरता अभियान राबविणार आहेत. या चित्ररथाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वसंतदादा पाटील विद्यामंदिर येथे संपन्न झाले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त…

Read More

कचरा विलगीकरणास नागरिकांचा वाढता प्रतिसाद हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून जून महिन्यात शहरातून एकूण तब्बल ४७ हजार ७६६.७८५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. स्त्रोत पातळीवर कचऱ्याचे विलगीकरण, स्वतंत्र संकलन आणि वैज्ञानिक प्रक्रियेला दिलेल्या प्राधान्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात ३५ हजार २३.६०० टन सुका कचरा, ६ हजार ७३१.३२० टन ओला कचरा, ४ हजार ९७.८५० टन मिश्र कचरा, १ हजार ११८.२२५ टन ग्रीन वेस्ट, ४७९.२२५ टन चिकन वेस्ट आणि ३१६.५६५ टन मंडई वेस्ट संकलित करण्यात आला. संकलित कचऱ्यावर विविध प्रक्रिया केंद्रांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून पुनर्चक्रीकरण तसेच…

Read More

सुमारे १,५०० नागरिकांची बोटीच्या सहाय्याने सुटका; ५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, ७५० जनावरेही वाचविली. हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले. अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, भोसरीतील कुंदननगर तसेच शहरातील अन्य पूरग्रस्त अशा सुमारे २० ते २५ भागांमध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.…

Read More

‘इनोव्हेशन महाकुंभ २०२६’चा समारोप; माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून विद्यार्थिनींच्या नवोपक्रमांचे कौतुक हिंदवी न्यूज | मुंबई समाजातील प्रत्यक्ष समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधणाऱ्या विद्यार्थिनींच्या संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२६’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचा सोमवारी उत्साहात समारोप झाला. समारोपप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थिनींनी विकसित केलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची पाहणी केली आणि विद्यापीठाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ५ आणि ६ जुलैदरम्यान आयोजित या प्रदर्शनात आरोग्य, पर्यावरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, वस्त्रोद्योग, जलसंवर्धन आणि सामाजिक समस्यांवर आधारित अनेक नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. उद्योग, संशोधन आणि समाज यांना जोडणारे हे…

Read More

एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाचे उद्घाटन हिंदवी न्यूज | पिंपरी ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानातून निर्माण झालेले भारतीय संविधान हे वकिलांची भगवद्गीता आहे!’ असे विचार पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे यांनी गणेशनगर, दापोडी येथे व्यक्त केले. एस. एस. पी. शिक्षण संस्था संचलित एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सतिश गोरडे बोलत होते. पुणे ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळुराम भुजबळ अध्यक्षस्थानी होते; तसेच एस. एस. पी. शिक्षण संस्थेचे चेअरमन एस. बी. पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुहास पडवळ, फॅमिली बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कल्पना निकम, प्राचार्या…

Read More

४२०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड मनपा यंत्रणा हायअलर्टवर हिंदवी न्यूज|पिंपरी शहरात काल दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर (फील्डवर) कार्यरत आहेत. शहरात आतापर्यंत ३२६ मिमी पावसाची नोंद झाली असून, काही सखल भागांतील रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सुमारे ४२०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वेगवेगळ्या १७ ते १८ ठिकाणी तात्काळ बोटी तैनात केल्या आहेत. पूरबाधित नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विविध मदत केंद्रांना महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय…

Read More

महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये भोजन, आरोग्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत हिंदवी  न्यूज | पिंपरी  अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती उद्भवल्यानंतर आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध बाधित भागांतील ४२०० व्यक्तींचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पूरबाधितांसाठी महापालिकेने विविध ठिकाणी निवारा केंद्रे तयार केली असून तेथे भोजन, आरोग्यासह आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी होऊ नये, यासाठी महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले आहे. आयुक्त डॉ.…

Read More

मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार माउलींच्या पालखीचे प्रस्थान हिंदवी न्यूज |आळंदी देवाची, पालखी सोहळा मालक, दिंडीप्रमुख,मानकरी, सेवेकरी, प्रतिष्ठित अशा एकूण १६६० व्यक्तींच्या उपस्थितीत माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पाऊस, महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवारी (दि.८) दुपारी तीन वाजता हा सोहळा पार पडणार आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

Read More

हिंदवी न्यूज | पुणे भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या सात तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यम तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्या बंद राहणार आहेत. घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.तथापि, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेहमीप्रमाणे शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कामकाज पार पाडावे,…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी, दि. ६ जुलै : शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महापौर रवि लांडगे यांनी आज दिवसभर विविध पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या तसेच कोणत्याही नागरिकाला अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. महापौरांनी सर्वप्रथम चिखली प्राधिकरण परिसरातील घरकुल येथे भेट देऊन पाण्यात उतरून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, नागरिकांच्या भावना जाणून घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांसह लवकरच संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी आणि परिणामकारक तोडगा काढण्यासाठी कडक कार्यवाही करण्यात येईल,…

Read More