Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | आळंदी अखिल भारत हिंदू महासभा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दाखल घेत हि नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अखिल भारत हिंदू महासभा वरिष्ठ उपाध्यक्ष वैभवराज रौंधळ यांनी दिली. या वेळी आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री. श्री. १००८ जगतगुरु, स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज, कार्यकारी अध्यक्ष योगेद्र वर्मा जी, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज शिवाजी रौंदळ, राष्ट्रीय महामंत्री डॉ. सिद्धार्थ भट्टाचार्य. राष्ट्रीय कोषाध्यक्ष साक्षी वर्मा जी, महामंत्री आचार्य अजय कृष्ण शास्त्री, राष्ट्रीय धर्म प्रचारक योगी दादानाथजी गुरु सुखनाथजी, योगी महंत शिवनाथजी महाराज, बालयोगी ऋषिकेश नाथजी महाराज, प्रकाशनाथजी महाराज, योगी शीतलनाथजी, योगी सुंदरनाथजी, महंत…
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान हिंदवी न्यूज | पिंपरी मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर ओसरल्यानंतर परिसरात साचलेला चिखल, कचरा व घाणीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ‘मानवतेची सेवा हीच ईश्वरसेवा ‘ या संदेशाला कृतीत उतरवत संत निरंकारी मिशनच्या सेवादल यांनी पूरग्रस्त भागात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना दिलासा दिला. मिशनच्या स्वयंसेवकांनी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच पूरग्रस्त वस्त्यांमध्ये श्रमदान करत पूरग्रस्त घरांतील चिखल व कचरा हटविण्याचे कार्य केले. परिसर स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी स्वयंसेवकांनी अनेक तास परिश्रम घेतले. याचबरोबर पूरग्रस्त व गरजू नागरिकांसाठी शिजवलेल्या अन्नाचे वितरण करण्यात आले. अनेक कुटुंबांना…
‘प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे; प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील, धीर सोडू नका’ – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हिंदवी न्यूज | पिंपरी मोशी कचरा डेपो येथे सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान महा -पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटना स्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून इमारतीत अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी यंत्रणांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत धीर धरा, यामध्ये निश्चितपणे अडकलेल्या व्यक्ती सुखरुपपणे बाहेर येतील असा दिलासा देखील नातेवाईकांना त्यांनी दिला. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची…
नागरिकांच्या सुटकेसाठी मलबा हटविण्याचे काम सुरू हिंदवी न्यूज | पिंपरी मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेतील अडकलेल्या व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यासाठी दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतालचा मलबा हटवला जात असून इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. या इमारतीत जवानांना प्रवेश करण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करून आत अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य हाती घेण्यात येणार आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, महापालिका अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन व इतर संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. बचावकार्याची सद्यस्थिती, शोधमोहीमेची प्रगती, उपलब्ध…
हिंदवी न्यूज | आळंदी लाखो वैष्णव भक्तांचे मांदियाळीने भगव्या पताका उंचावत आळंदीहून उद्योगनगरी मार्गे पुण्यनगरीकडे माऊलींचा पालखी सोहळा पहाटे हरिनाम गजरात मार्गस्थ झाला. अलंकापुरीतील जुना श्रीपादबुवा गांधी वाडा आणि राम वाड्याचे जागेत नव्याने विकसित दर्शनबारी मंडप आजोळघरी ( गांधीवाडा ) माऊलींचे पालखी सोहळ्याने पहिल्या मुक्कामात श्रीक्षेत्रोपाध्ये श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी परिवारासह आळंदीकरांचा पाहुणचार घेतला. श्रींच्या वैभवशाली पालखी सोहळ्याने गुरुवारी ( दि.९ ) दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीकडे प्रवासास सुरुवात केली. पंढरी जाण्यास आळंदीकरांचा हृदयस्पर्शी निरोप गांधीवाड्यातून तसेच नगरपरिषद चौकातून निरोप दिला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस विसावणार असून शनिवारी ( दि. ११…
पाहुणचारास सोहळा गांधी वाड्यात विसावला हिंदवी न्यूज |आळंदी वारकरी संप्रदायाचे प्रतीक गळ्यात तुळशीमाळ, हातात भगव्या पताका, मुखाने हरिनामाचा गजर करीत लाखो भावीकांचे उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात माउलींच्या पालखीचे प्रस्थान भक्ती मार्गाचे दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माउली मंदिरातील विना मंडपातून बुधवारी ( दि. ८ ) हरिनाम गजरात सायंकाळी सव्वा सहाचे सुमारास झाले. प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी प्रयत्न केले. या साठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या मुळे मर्यादित वारकरी, भाविकांचे उपस्थितीत श्रींचे पालखी सोहळ्याने प्रस्थान हरिनाम गजरात ठेवले. या वेळी आळंदीकर ग्रामस्थ युवक तरुणांनी श्रींची पालखी खांद्यावर …
हिंदवी न्यूज | पिंपरी काल ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्यादरम्यान रात्री उशिरापर्यंत ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे..या बचावकार्यातील शोधमोहीमेमध्ये आज ९ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास एका नागरिकाला बाहेर काढण्यात आले असून या गंभीर अवस्थेतील नागरिकाला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव भावेश वाणी असे आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती ते मृत असल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी दुपारी…
महापौर रवि लांडगे यांचे हस्ते दिंडी प्रमुख व वीणेकरांचा सन्मान. महापालिकेकडून प्रत्येक दिंडीस आरोग्य किटचे व वृक्षारोपणासाठी देशी बियाणांचे वाटप हिंदवी न्यूज | पिंपरी “रामकृष्ण हरी” च्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या1चे आज पिंपरी-चिंचवड नगरीत भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आगमन झाले. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पालखी सोहळा प्रमुख, तसेच वीणेकरांचा सत्कार करून त्यांचे नगरीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने पालखी सोहळ्यात सहभागी प्रत्येक दिंडीला आरोग्य किटचे (प्रथमोपचार पेटी) वाटप करण्यात आले तसेच पर्यावरण वृध्दीसाठी देशी बियाणांच्या पाकीटाचेही वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर…
हिंदवी न्यूज | देहूगाव संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा अखंड गजर, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण, टाळ-मृदंगाचा निनाद आणि लाखो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अशा भक्तिमय वातावरणात श्रीक्षेत्र देहूगाव येथून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दुपारी ३ वाजता प्रस्थान ठेवले. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या पत्नी तसेच उपमुख्यंमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. मानाच्या अश्वांची प्रदक्षिणा, पारंपरिक धार्मिक विधी, मानकरी, दिंड्यांचे वीणेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने अवघे देहू भक्तिरसात न्हाऊन निघाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या पालखी प्रस्थान सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशभरातून आलेल्या भाविकांनी देहूनगरी फुलून गेली होती. वरुण…
प्रमुख पालखी मार्गांवर ७ वैद्यकीय पथके, ७३ अधिकारी-कर्मचारी, २४ तास रुग्णवाहिका व आरोग्यसेवेची व्यापक व्यवस्था हिंदवी न्यूज | पिंपरी आषाढी पालखी सोहळा २०२६ निमित्त लाखो वारकरी पिंपरी-चिंचवड शहरातून मार्गक्रमण करणार असून त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने व्यापक नियोजन केले आहे. वारकऱ्यांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी सात वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रथमोपचार किट, कार्डियाक रुग्णवाहिका तसेच स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत एकूण ७ वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असून त्यामध्ये ७३ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट,…