Author: Hindavinewsnetwork@gmail.com
पिंपरी ( हिंदवी न्यूज) : पुण्यातील विद्या महामंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲड. अभय आपटे यांच्या हस्ते लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम मगरे यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन हृदयस्पर्शी वातावरणात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष अपर्णा कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ मीनाक्षी मगरे यांचा देखील सत्कार करण्यात आला. समारंभास संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लीलाधर गाजरे, संचालक पवन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्या महामंडळ संस्थेचे माजी अध्यक्ष, विद्यमान कार्यकारणी सदस्य, संस्थेतील सर्व विभागाचे शिक्षक वृंद, सेवक, सेवा निवृत्त प्राचार्य गौतम मगरे सरांचे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्र परिवार, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, राज्य व जिल्हा…
५२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा, ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी घेतला कर सवलतींचा लाभ महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी करदात्यांचे मानले आभार पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कर वसुलीचा उच्चांकी ‘माईलस्टोन’ गाठला आहे. अवघ्या तीन महिन्यांत ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे. ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी पहिल्या तिमाहीमध्येच ५९.८४ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. याबद्दल सर्व करदात्यांचे महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आभार मानले आहेत.…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- आज आपण जे वैभवशाली शहर पाहत आहोत, त्या शहराच्या विकासाचे स्वप्न माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीतून साकारले आहे.त्यांच्या कार्याची आठवण म्हणून महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे नाव दापोडी ते निगडी अशा रस्त्यास देण्यात आले असून त्यामुळे पुढील पिढ्यांना त्यांच्या व्यापक कार्याची ओळख होईल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या नुकत्याच झालेल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करत, दापोडी ते निगडी या मुख्य रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे दापोडी येथील नामकरण फलकाचे अनावरण पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर सुधार समितीचे…
उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार पिंपरी, (हिंदवी न्यूज)- महानगरपालिकेच्या विविध विभागांत प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावत सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या जडणघडणीत तसेच शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे,त्यांच्या या उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल महापालिकेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी त्यांचा सत्कार करत त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान समारंभात जून २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे ४२ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेले १५ अशा एकूण ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे,मुख्य कामगार कल्याण…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा विविध रुग्णालय व दवाखान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्रीम. इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालय सांगवी येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते, ह.भ.प. मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी येथे उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते तसेच तालेरा रुग्णालयात आमदार उमा खापरे ,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भोसरी रुग्णालय येथे महिला व बालकल्याण समिती सभापती राणीताई पठारे, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, नगरसदस्य विराज लांडे, ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसदस्या भीमाताई फुगे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या…
पिंपरी,(हिंदवी न्यूज)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ उत्साहात संपन्न झाले. संभाजीनगर, चिंचवड येथील साई मंदिर उद्यानात आयोजित या प्रबोधन पर्वामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या समतावादी, पुरोगामी व लोककल्याणकारी विचारांचा जागर विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला. प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी माजी महापौर मंगला कदम,नगरसदस्य कुशाग्र कदम, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे,उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष जगदीश परिट, सचिव सुनील पाटील, खजिनदार मिलिंद वेल्हाळ,…
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक एकता,न्याय व शिक्षणाच्या व्यापक विचारांचा वारसा भावी पिढ्यांनी जोपासावा – उपमहापौर शर्मिला बाबर पिंपरी, (हिंदवी न्यूज) : राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक एकता, शिक्षण,न्याय व मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आणि त्यांचे व्यापक विचार आजही दिशादर्शक व प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा भावी पिढ्यांनी जोपासावा, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस तसेच पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील झालेल्या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) : पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस तसेच पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि विकासासाठी दिलेले योगदान अनमोल असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला गेला, त्यांच्या कार्याचे,दूरदृषाटी व व्यापक विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
३० जूनपासून घरभेटींद्वारे मतदार पडताळणी पिंपरी, (हिंदवी न्यूज): २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या तयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि नवनियुक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रगणना पत्रक भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच घरभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या ६ लाख ३६ हजार ४२४ मतदार असून मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण ५८.६६ टक्के आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ४८३…
लोककलावंतांना एकत्र आणणारा ऐतिहासिक सोहळा; समरसता लोककला संमेलन पिंपरी,(हिंदवी न्यूज) : जनसामान्यांच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार असलेल्या लोककला आज कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर असून महाराष्ट्राचा हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा जतन, संवर्धन आणि संशोधनासाठी स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना होणे ही काळाची गरज आहे,शासनाने लोककलावंतांना आणि लोककलेच्या उपासकांना एका व्यासपीठावर आणण्याची संधी उपलब्ध करून दिली, हीच ऐतिहासिक बाब आहे. हा लोककलावंतांचा पहिलाच महोत्सव ठरला आहे” असे प्रतिपादन रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या समारोप समारंभात ते…