Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी-चिंचवड | दि. ६ जुलै पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ३१ मधील पारस हॉस्पिटलसमोरील विनायक नगर, आदर्श नगर आणि इंद्रप्रस्थ सोसायटीसमोरील रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक माऊलीशेठ जगताप यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी पावसाच्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले. नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पाण्यात अडकलेली वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात मदत करण्यात आली. तसेच नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी संजय मराठे मित्र परिवाराने सक्रिय सहभाग घेतला. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक ती खबरदारी…
हिंदवी न्यूज | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.मुसळधार पावसामुळे आळंदी व देहू येथील मंदिर परिसर तसेच धर्मशाळांमध्ये इंद्रायणी नदीचे पाणी शिरले असून परिस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने वारकरी व भाविकांना सध्या ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबण्याचे, पुढील प्रवास न करण्याचे तसेच नदी, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या मार्गांवरून जाण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले आहे.पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतर आणि मार्ग खुले झाल्यावर पुढील प्रवासाबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले…
चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणारा रस्ता नदीचा प्रवाह रस्त्यावर आल्याने बंद. हिंदवी न्यूज | पिंपरी चिंचवड गावातून काळेवाडीकडे जाणारा रस्ता नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढत असून नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी या मार्गावर जाणे टाळावे.तसेच वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार सन्मान हिंदवी न्यूज|पिंपरी नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात थरार न्यूज नेटवर्कचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘भला माणूस’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता चिंचवड…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- महापालिकेने शालेय साहित्य खरेदीसाठी काढलेली निविदा ही महाराष्ट्र शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) धोरणाच्या विरोधात असून, त्यामुळे पालकांचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. ही संपूर्ण निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य विकास साने यांनी केली. स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करत विकास साने यांनी प्रशासनाला जाब विचारला. या बैठकीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ममता शिंदे, वरिष्ठ अधिकारी, स्थायी समितीचे सभापती व सदस्य उपस्थित होते. शासनाच्या डीबीटी धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. विकास साने म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार…
आळंदी ( हिंदवी न्यूज) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी वारी पालखी सोहळा सन २०२६ अंतर्गत सप्ताह हरिनाम गजरात प्रारंभ झाल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. श्रींचे संजीवन समाधी मंदिरात १ ते ८ जुलै या दरम्यान सप्ताह मंदिरात साजरा होत आहे. या निमित्त मंदिरात सायंकाळी चार ते पाच या वेळात प्रवचन आणि सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात कीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये राज्यातील नामवंत प्रवचनकार अशोक महाराज इदगे, दत्तात्रेय माशेरे महाराज, कृष्णा पडवळ महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, भागवत महाराज साळुंखे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांची…
पिंपरी,(हिंदवी न्यूज) ता. २ : रुग्ण हक्क परिषद पिंपरी-चिंचवड शहर, ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यसनमुक्त तरुणाई महासंकल्प सभा’ आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे तसेच अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड उपस्थित राहणार आहेत. माजी सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे हे प्रमुख वक्ते म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करणे, व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प दृढ करणे आणि युवकांना…
ज्ञानप्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन पिंपरी (हिंदवी न्यूज)-“देशाचा शाश्वत आर्थिक विकास साधायचा असेल, तर इनोव्हेशन केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाभिमुख, सर्वसमावेशक आणि व्यापक व्हायला हवे. ग्रामीण भाग, महिला, स्वयं-सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि तळागाळातील उद्योजकांना सक्षम करणारी नवोन्मेषाची परिसंस्था उभारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसीएल) संस्थापक संचालक विवेक सावंत यांनी केले. नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन, देसाई ब्रदर्स लिमिटेड आणि ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या ज्ञान प्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राचे (एसीआयसी) उद्घाटन विवेक सावंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन प्रसंगी अटल इनोव्हेशन मिशनचे अधिकारी…
पिंपरी,(हिंदवी न्यूज)- शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने (अभिमत विद्यापीठ) प्रतिष्ठित अशा ‘टाइम्स हायर एज्युकेशन सस्टेनेबिलिटी इम्पॅक्ट रँकिंग २०२६’ (Times Higher Education Sustainability Impact Ratings 2026) मध्ये ८३.९ च्या उत्कृष्ट एकूण गुणांसह (Overall Score) देशात ६ वे आणि जागतिक स्तरावर १०१ ते २०० च्या श्रेणीत स्थान मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शाश्वत विकास उद्दिष्टांची (SDGs) पूर्तता करण्याच्या निकषांवर हे जागतिक मानांकन जाहीर केले जाते. यामध्ये विद्यापीठाने आरोग्य, शून्य उपासमार आणि पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांमधील (SDG)…
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी – महापौर रवि लांडगे पिंपरी, (हिंदवी न्यूज)- “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सलग अकरा वर्षे विराजमान होण्याचा मान मिळविणारे तसेच हरित क्रांतीचे जनक म्हणून सर्वदूर ओळख असणारे वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी होते.” असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी त बोलत होते. या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,…