Author: Hindavinewsnetwork@gmail.com
पिंपरी (हिंदवी न्यूज), पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांना प्रवेश सुलभ करणे, भेटीची डिजिटल नोंद ठेवणे व कार्यालयीन सुरक्षा बळकट करणे या उद्देशाने ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय, मुंबई येथे अभ्यागत व प्रवेश व्यवस्थापनासाठी असणाऱ्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली सुरू केली आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या महानगरपालिका कार्यालयात प्रवेशासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘स्वागतम ई-पास’ या लिंकद्वारे आपली नोंदणी करणे…
छत्रपती संभाजीनगर येथे प्रबोधन पर्वाची जोरदार तयारी सुरू, महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते रंगमंच उभारणीचा शुभारंभ पिंपरी (हिंदवी न्यूज) ‘छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वा’च्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार, कार्य आणि इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. १० मे ते १४ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या या विचार प्रबोधन पर्वात विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागर निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रमही यानिमित्त राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर येथे दि. १० मे ते…
पिंपरी (हिंदवी न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची आढावा बैठक समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहरातील क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी चार महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसेच शहराच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक धोरणांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीस समिती सदस्य भाऊसाहेब भोईर, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, योगेश लांडगे, जितेंद्र ननवरे तसेच उपआयुक्त पंकज पाटील आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. बैठकीत शहरातील नागरिक, खेळाडू, कलाकार आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकाभिमुख प्रस्ताव…
पिंपरी (हिंदवी न्यूज), पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून महापालिकेच्या १७ माध्यमिक मराठी शाळांचा एकूण निकाल ८८.५९ टक्के लागला आहे. तसेच उर्दू माध्यमाच्या ८ शाळांचा निकाल ९७.८७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांना या निकालातून यश मिळाल्याचे दिसून आले आहे. महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे तसेच प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या २५ माध्यमिक शाळांमधून एकूण २…
पिंपरी (हिंदवी न्यूज) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील कस्तुरी मार्केट परिसरातील ५० अनधिकृत दुकानांवर धडक कारवाई केली. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशान्वये करण्यात हि कारवाई करण्यात आली. अतिक्रमण उपायुक्त तथा ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. प्रशासन अधिकारी महादेव बोरे यांनी कारवाईचे नेतृत्व केले. यावेळी मार्केटमधील दुकानांनी केलेले अनधिकृत साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन यासह रस्त्यावर अनधिकृतपणे उभारलेली लोखंडी पत्राशेड हटविण्यात आली. या अतिक्रमणांमुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे हि धडक कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी ३ जेसीबी मशीन, ३ पिंजरा गाड्या, ४३ एमएसएफ जवान आणि ६ मनपा मजूरांचा…
पिंपरी (हिंदवीन्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात आरोग्य शिबिर, भूमिपूजन, उद्घाटन, जयंती इत्यादींसाठी मंडप स्टेज व्यवस्था करणे, आकुर्डी हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, मनपा कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयांनी कचरा संकलन…
पिंपरी (हिंदवीन्यूज) चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात व्यापक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे गुरव येथील ५३० चौ.मी. तसेच ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी परिसरातील १ हजार ५४५ चौ.मी. अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच इतर नियमबाह्य उभारण्यात आलेली बांधकामे देखील पाडण्यात आली. मागील दिवसात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील धडक निष्कासन कारवाईचा आढावा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकताच घेतला. त्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई अधिक सक्त करण्याचे निर्देश…
पिंपरी (हिंदवीन्यूज): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन रुग्णालयातील विविध आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला. रुग्णालयातील स्वच्छता, औषधसाठा, डॉक्टर व परिचारिका यांची उपलब्धता तसेच उपचार प्रक्रियेची कार्यक्षमता याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले. उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या किवळे येथील ७५ सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर पिंपरी(हिंदवीन्यूज) पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील प्रत्येक पात्र कुटुंबाला सुरक्षित आणि मूलभूत सुविधांनी सुसज्ज घर मिळाले पाहिजे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या किवळे प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमध्ये निवड झालेल्या नागरिकांचे शहरातील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या उर्वरित ७५ सदनिकांची चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथील सभागृहात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर रवि लांडगे…
शहर स्वच्छतेचा संदेश कृतीतून साकार पिंपरी(हिंदवीन्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ कोयनानगर येथे आयोजित करण्यात आलेला प्लॉगाथॉन उपक्रम उत्साहात पार पडला. शहर स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात उपायुक्त संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहा. आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक गौरव दराडे, महेंद्र साबळे, समाधान कातड, रामचंद्र शिंगाडे यांच्यासह सुमारे २५०…