Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पिंपरी-चिंचवडसह देशभरात श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा जागर पिंपरी ,(हिंदवी न्यूज) मानवता, प्रेम व आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक असलेल्या युगद्रष्टा बाबा हरदेव सिंह यांच्या पावन स्मृती प्रीत्यर्थ   बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी हरियाणा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे समर्पण  दिवस कार्यक्रम  आयोजित करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून  सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज तथा श्रद्धेय निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात कार्यक्रम  संपन्न होणार आहे,  श्रद्धाळूंनी  आशीर्वचनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात जवळपास १७ ठिकाणी समर्पण दिवस सायंकाळी साडेसहा ते नऊ या वेळात पार पडणार आहे.…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या “यशवंतराव चव्हाण स्मारक समिती”ला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप, उपमहापौर  शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक  बारणे, विधी समिती सदस्य कुशाग्र कदम तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या औद्योगिक, सहकारी आणि विकासात्मक धोरणांद्वारे आधुनिक महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडसारखी छोटी गावे देशातील अग्रगण्य औद्योगिक शहरांमध्ये विकसित झाली. लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला…

Read More

पिंपरी ,(हिंदवी न्यूज) पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेत देशात अव्वल स्थानावर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर रवि लांडगे म्हणाले की, शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी नागरिकांचे मत अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देत प्रत्येकाने आपला अभिप्राय नोंदवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “मी माझा अभिप्राय दिला आहे, आपणही जरूर नोंदवा,” असे सांगत महापौर रवि लांडगे…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय…’, ‘जय भवानी, जय शिवाजी.’ च्या जयघोषात आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या नेत्रदीपक दृश्यांनी चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर परिसरातील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानाचा परिसर  दुमदुमून गेला.  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रबोधन पर्वाचे उदघाटन उपमहापौर शर्मिला बाबर,आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते  करण्यात आले.  कार्यक्रमाला माजी महापौर मंगला कदम, स्थायी समिती…

Read More

या पदवी प्रदान समारंभातून विकसित भारताचे भावी शिल्पकार घडत आहेत” : ज्योतिरादित्य एम. सिंधिया. पिंपरी, (हिंदवी न्यूज) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) येथे 17 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभासाठी  केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री (भारत सरकार ) ज्योतीरादित्य सिंधिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  डॉ. पी. डी. पाटील ,(कुलपती,  डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) होते. या कार्यक्रमात मा. डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग (निवृत्त) माजी प्रभारी कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि माजी अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मौजे चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ हजार ३३६.२८ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.  या कारवाईमध्ये मौजे कुदळवाडी येथील विसावा चौक ते पोलीस चौकी रस्त्यावरील गट क्रमांक ७०० मधील अनधिकृत पत्राशेड, जाधववाडी रस्ता येथील गट येथील अनधिकृत वीट बांधकाम पत्राशेड, कुदळवाडी पोलीस चौकीजवळील गट क्रमांक ६७८ मधील अनधिकृत आरसीसी बांधकाम तसेच सावता माळी मंदिर रस्ता, जाधववाडी येथील अनधिकृत पत्राशेड अशा विविध बांधकामांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई  करण्यात आली. बांधकाम…

Read More

महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार पिंपरी (हिंदवी न्यूज).: पिंपरी चिंचवड ही नगरी कबड्डी खेळाची पंढरी आहे. येथून अधिकाधिक राष्ट्रीय खेळाडू घडावेत आणि क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव देशभरात नावलौकिक मिळावा, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले. प्रो कबड्डीच्या माध्यमातून खेळाडूंना मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात अधिकाधिक खेळाडूंनी या क्षेत्रात यश संपादन करावे, असे देखील त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले. महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ चे भोसरी येथील गावजत्रा मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला खासदार श्रीरंग आप्पा बारणे…

Read More

मोरवाडी कार्यालयात शहर पक्ष संघटनेच्या कामकाजाचा घेतला आढावा पिंपरी (हिंदवी न्यूज) “राजकारणात काम करत असताना पक्ष संघटना ही नेहमी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असते. प्रत्येक कार्यकर्त्याने ही भावना मनाशी पक्की बाळगली पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षात संघटनेपेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीही नाही,” असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त शहर प्रभारी अ‍ॅड.  भरत पाटील यांनी केले. मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पिंपरी-चिंचवड शहराच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अ‍ॅड. पाटील यांची प्रभारीपदी नियुक्ती केल्यानंतर आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला शहराध्यक्ष शत्रूघ्न…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) अंगारकी चतुर्थी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळातर्फे ‘चिंचवडचा राजा’ गणपती मंदिरात  मोगरा महोत्सव व चंदन उटी सोहळा’ मोरया भक्त व चिंचवडकर नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. अंगारकी चतुर्थी निमित्त चिंचवडचा राजा गणपतीची महाआरती सामाजिक कार्यकर्ते उद्योजक  उमेशभाऊ चांदगुडे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक राहुल कलाटे, ॲड. रोहन जमादार माळवदकर, नगरसेवक मंदार देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, कुणाल लांडगे, मंडळाचे आधारस्तंभ विठ्ठल सायकर, ॲड.सुनिल होनराव, संजय संगमनेरकर, हेमंत डांगे, महेश लांडगे, सोमेश चव्हाण, राजेश शिरोळे, सुहास पोफळे , कार्याध्यक्ष महेश मिरजकर, ॲड.विपुल नेवाळे यांसह मंडळाचे…

Read More