Author: Hindavinewsnetwork@gmail.com
भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी माथाडी संघटन महामेळाव्याचे उद्घाटन – अनुप मोरे
हिंदवी न्यूज पिंपरी, दि. २६ सप्टेंबर २०२६::पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत विविध उपाययोजना करण्यात आल्या. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती तसेच शाडू मातीच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता पर्यावरणपूरक पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने एकूण ६३ कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. या माध्यमातून सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून, यामध्ये सुमारे ३८ हजार ८६ पर्यावरणपूरक म्हणजेच शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा समावेश आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध आकडेवारीनुसार, अ क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ७८०, ब…
हिंदवी न्यूज | पिंपरी थोर विचारवंत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनास महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,उप आयुक्त आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन; पारंपरिक वाद्यांसह विविध रथांनी वेधले लक्ष हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी, दि. २५ सप्टेंबर २०२६ : भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शांततामय वातावरणात पार पडली. ढोल-ताशा, ढोल-लेझीम, पारंपरिक वाद्ये तसेच डीजेच्या गजरात गणरायाचा जयजयकार करत गणेशभक्त मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील बापूजी बुवा चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सहाय्यक अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि कार्यकारी अभियंता किरण अंदुरे यांच्या हस्ते सन्मान…
माहिती अधिकार अधिकाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता जनजागृती उपक्रम राबवण्याची काळे यांची मागणी. हिंदवी न्यूज | पिंपरी माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने माहिती अधिकार दिनानिमित्त नागरिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत सतीश काळे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे निर्देश आहेत. या दिवशी प्रश्नमंजुषा,चर्चासत्र, व्याख्यान तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबवून नागरिकांना माहिती अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या…
आ. उमाताई खापरे, श्री.अनुप मोरे, श्री.तुषार हिंगे, श्री.जयदीप खापरे यांच्या माध्यमातून आणि ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने महामेळाव्याचे आयोजन; मा.श्री.रविंद्र दादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ‘महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी शहरात भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. आ. मा.सौ. उमाताई खापरे यांच्या विशेष पुढाकाराने आणि अनुप मोरे, तुषार हिंगे, जयदीप खापरे यांच्या माध्यमातून आणि ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने या महामेळाव्याचे…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपळे सौदागर परिसरातील गणेशम-२ सोसायटीमध्ये प्राथमिक माहितीनुसार, I-304 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अनंतवार कुटुंबीय यांच्या फ्रिजचा स्फोट होऊन फ्लॅटला गंभीर आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी कोणताही विलंब न करता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. घटनेत घरातील मुलांना त्रास झाल्याची माहिती मिळताच तातडीने ॲम्बुलन्सची व्यवस्था करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्यानंतर नाना काटे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या मुलांची विचारपूस केली तसेच त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. दरम्यान, नाना काटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची…