Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी चिंचवड येथील स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती संचलित ‘भारत माता भवन’च्या वास्तुवृद्धीचा (इमारतीवर दोन नवीन मजले) बांधण्याच्या कामाचा शुभारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते रविवारी पार पडला. या वास्तूच्या विस्तारासाठी बारणे यांनी खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी देण्याची ग्वाहीदेखील खासदार बारणे यांनी या वेळी दिली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक मुकुंदराव कुलकर्णी, प्रांत संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, पिंपरी-चिंचवड शहर संघचालक विनोद बन्सल, संघ अधिकारी विनायकराव थोरात, महापालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे अध्यक्ष मंदार देशपांडे, प्रकल्प आर्किटेक्ट उदय कुलकर्णी, जयदीप खापरे, रवी नामदे, उदय हळदीकर उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कार्यरत…
नागरिकांना संयम बाळगण्याचे वन विभागाचे आवाहन हिंदवी न्यूज | बेळगाव/पुणे खानापूर वन उपविभागातील विविध भागांत गेल्या आठवडाभरापासून फिरत असलेल्या हत्तींच्या कळपाला पुन्हा जंगलात परतविण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. या कळपात सुमारे नऊ हत्ती असून, बुधवारी रात्री भीमगड वन्यजीव क्षेत्रातील पाली गावाजवळील भाताच्या शेतात सात हत्ती आढळून आले. या कळपात एका नर हत्तीबरोबर दोन पिल्लेही असल्याने वन विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. खानापूरचे सहाय्यक वनसंरक्षक बसवराज वाळद आणि वनक्षेत्र अधिकारी सय्यदसाब नदाफ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत वन कर्मचाऱ्यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी पाली गावाजवळील भाताच्या शेतात हत्तींचा कळप असल्याची खात्री करण्यात आली. खानापूर उपविभागातील…
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव अमृतराव शिर्के (वय ८१ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) निधन झाले.
आबू रोड येथे राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ च्या स्वागत सत्राला देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती हिंदवी न्यूज | आबू रोड, ९ सप्टेंबर : ‘श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’ या संकल्पनेवर आधारित ब्रह्माकुमारी संस्थेच्या मीडिया व जनसंपर्क प्रभागातर्फे आयोजित राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ चे स्वागत सत्र बुधवारी आबू रोड येथील मानसरोवरच्या दिव्य शक्ती अनुभूती हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या सम्मेलनात भारतातील विविध राज्यांसह फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि नेपाळ येथील पत्रकार व मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ▫️आत्मिक सशक्तीकरणातून श्रेष्ठ विश्वाची निर्मिती : जयंती दीदी ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त प्रशासिका राजयोगिनी बी.के. जयंती दीदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सम्मेलनाला शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या,…
विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गांचा अवलंब केला पाहिजे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिला.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला, तरी लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याचा स्पष्ट संदेश त्याने दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे आयोजित श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवादरम्यान उपस्थित हजारो चाहत्यांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने आपल्या कमबॅकचे संकेत दिले.
रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले
प्रभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने ल क्षेत्रीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका रेखा ताई देवकर यांचा सत्कार करण्यात आला.