Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»हिंजवडी मेट्रोच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार
पिंपरी चिंचवड

हिंजवडी मेट्रोच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 17, 2026Updated:November 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवास: वाकड मेट्रो स्थानकाची पाहणी.

प्रवासी, आयटीयन्स, नागरिकांशी साधला संवाद

हिंदवी न्यूज |  पिंपरी

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गावर ( वाकड चौक ते माण फेज ३)  सोमवारी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी प्रवास केला. यावेळी त्यांनी  प्रवासी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, नागरिकांशी संवाद साधला आणि प्रवाशांच्या अडचणी, अपेक्षा आणि विविध मागण्या जाणून घेतल्या. तसेच वाकड मेट्रो स्टेशन परिसरातील कामाची पाहणी करून या मेट्रो मार्गाचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा, प्रवास सुलभ व्हावा व शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासंदर्भात नियोजन करावे,  अशा सूचना यावेळी मेट्रो तसेच पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी (दि.१६) हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गावर (वाकड चौक ते माण फेज ३) प्रवास केला. यावेळी नागरिकांसह पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL), पीएमपीएमएल, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, हिंजवडी मेट्रो हा खऱ्या अर्थाने ‘आयटीयन्स’साठी  मोठा दिलासा आहे. मोठ्या संख्येने आयटीयन्स  या मेट्रोचा उपयोग करत आहेत.  शहरातील इतर कनेक्टिव्हिटीला या मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो सुविधेमुळे पुनावळे, ताथवडे, वाकड, मामुर्डी, किवळे, रावेत भागात देखील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे

  • मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार

आमदार शंकर जगताप म्हणाले, हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोमार्गा दरम्यान असलेल्या स्थानकांजवळ बहुमजली स्वयंचलित पार्किंग व्यवस्था उभारणे, स्थानकांपासून सुमारे १० किलोमीटर परिसरात नियमित फीडर बस सेवा सुरू करणे, तसेच वाकड मेट्रो स्थानकाचे प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील . वाकड स्थानकाला पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, निगडी, रावेत आणि आळंदी परिसरातील बससेवेशी जोडण्याची सूचनाही करण्यात आली. याशिवाय मेट्रो स्थानकांना निवासी व व्यावसायिक भागांशी जोडणारे सौरऊर्जायुक्त संरक्षित स्कायवॉक उभारणे, बस व मेट्रोचे मार्ग, वेळापत्रक, थेट लोकेशन व प्रवासखर्चाची माहिती देणारे एकात्मिक प्रवास नियोजन ॲप विकसित करणे, तसेच मेट्रो आणि फीडर बससाठी एकत्रित तिकीट व सवलतीचे पास उपलब्ध करून देणे. प्रवाशांच्या समस्या आणि सूचनांचा नियमित आढावा घेण्यासाठी मेट्रो–प्रवासी समन्वय समिती स्थापन करणे, तसेच पादचारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी व सायकलस्वारांसाठी स्थानक परिसर अधिक सुरक्षित व सुलभ करण्यावर भर द्यावा,  अशी सूचना केलेली आहे. या सर्व सूचनांचा आणि मागण्यांचा संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून मेट्रो सेवा अधिक प्रभावी, प्रवासीस्नेही आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

*********

💬हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो ही केवळ आयटीयन्ससाठीच नव्हे, तर पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सुविधा आहे. या मेट्रोचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळण्यासाठी स्थानकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा, फीडर बस सेवा, पुरेशी पार्किंग व्यवस्था आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांशी समन्वय असणे गरजेचे आहे. वाकड मेट्रो स्थानक हे प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागांची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होईल. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासही मदत होईल. यासाठी नागरिकांनी मांडलेल्या सूचनांबाबत संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

– शंकर जगताप,  आमदार,  चिंचवड विधानसभा, 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअलंकापुरीत छठ महापर्व उत्साहात. इंद्रायणीकाठी उत्तर भारतीयांची गर्दी
Next Article आळंदीत १ ते ८ डिसेंबर दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?