Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड महापालिका»पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामे आणि प्रस्तावांना मंजुरी
पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामे आणि प्रस्तावांना मंजुरी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील विविध भागांतील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, अग्निशमन यंत्रणा, आरोग्य सुविधा आणि उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कावेरी नगर टाकी व बायपास जलक्षेत्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली. तसेच गवळीनगर, दिघी, चऱ्होली, भोसरी, थेरगाव, चिंचेचा मळा, कासारवाडी, रावेत, किवळे, मामुर्डी आदी परिसरांतील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्ती, ड्रेनेज लाईन व चेंबर्सची दुरुस्ती तसेच पावसाळी गटारांची साफसफाई करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई आणि देखभाल, रस्ते व गटर्सची साफसफाई, नालेसफाई, बांधकामाचा राडारोडा उचलणे तसेच अतिक्रमण कारवाईसाठी आवश्यक मशिनरी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना मुदतवाढ देण्यासही मंजुरी देण्यात आली. याशिवाय महापालिका हद्दीतील आरोग्य कर्मचारी, त्यांची कुटुंबे, लहान मुले आणि युवा वर्ग तसेच सार्वजनिक शौचालयांच्या सर्वेक्षणासाठी ३८ सर्वेक्षणकर्त्यांच्या नियुक्तीला कार्योत्तर मान्यता देण्यात आली. त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यासही मंजुरी देण्यात आली.

अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांवर व्हीएचएफ वॉकीटॉकी आणि पीओसी वॉकीटॉकी यंत्रणा पुरविणे तसेच वायरलेस यंत्रणेत सुधारणा करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. शहरातील विविध रस्त्यांवरील पावसाळी गटारांची साफसफाई, विद्युत दाहिनीचे परिचालन व देखभाल-दुरुस्ती तसेच मोरवाडी आयटीआय इमारतीसाठी लिफ्ट उभारण्याच्या कामांनाही मान्यता देण्यात आली.

शहरातील विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी तात्पुरती प्रकाश व्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा, जनरेटर आणि सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मोशी खाण परिसरातील कार्यक्रम, श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा, महापौर चषक, राज्यस्तरीय क्रीडा कार्यक्रम तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील व्यवस्थांचा समावेश आहे.

तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील ६ हजार चौरस मीटर आणि पुनावळे येथील ७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ऑक्सिजन पार्क उद्यानांची केअरटेकरसह देखभाल करण्याचे काम १८ महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या विविध कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी फ्लेक्स आणि बॅनर्सची छपाई व पुरवठा करण्याच्या कामास मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. तसेच वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढी विभागातील ब्लास्ट फ्रीझर उपकरणाच्या आठ वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी वार्षिक देखभाल करारास (सीएमसी) मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीच्या या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, अग्निशमन व्यवस्था आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांमुळे शहरातील विविध विकासकामे आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

स्थायी समिती पिंपरी चिंचवड महापालिका
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप तापकीर आणि स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास कांबळे यांची निवड
Next Article यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करावे; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

November 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?