Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन
पिंपरी चिंचवड

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
  • नाट्य, संगीत, साहित्य, लोककला, मर्दानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
  • शहरातील गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी होणार गौरव

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच शहराच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.

महोत्सवाच्या आयोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महोत्सवाच्या स्वरूपाची व नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला, साहित्य, नाट्य, संगीत, क्रीडा आणि लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहरातील या सांस्कृतिक ऊर्जेला एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे, विविध पिढ्यांना सांस्कृतिक उपक्रमांशी जोडणे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा अधिक दृढ करणे हा महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

 

*विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची तीन दिवस मेजवानी*

तीन दिवसीय महोत्सवात सर्व वयोगटांतील नागरिकांचा सहभाग राहील, अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. नाट्यरसिकांसाठी दर्जेदार व लोकप्रिय व्यावसायिक मराठी नाटकांचे विशेष प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायक-कलाकारांच्या सहभागातून भावगीत, नाट्यगीत, भक्तिगीत तसेच लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांचा समावेश असलेली संगीत मैफल आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक लावणीचे सादरीकरण, तरुणाईसाठी आधुनिक संगीत आणि फ्यूजनचा समावेश असलेला रॉक बँड परफॉर्मन्स तसेच विविध सामाजिक विषय, हास्य-विनोद आणि समकालीन आशय मांडणाऱ्या नामवंत कवींचे राज्यस्तरीय कवी संमेलन हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

महिलांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी पाककला स्पर्धा आणि फॅशन शो आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या लाठी-काठी, दांडपट्टा व अन्य मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात येणार आहेत.

बालकलाकारांच्या अभिनय व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी बालनाट्य व बाल एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक वस्तू, हस्तकला, स्थानिक कलाकुसर आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘संस्कृती जत्रा’ व प्रदर्शनाचे आयोजनही महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

 

*शहरातील गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी गौरव*

पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या तसेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा महोत्सवादरम्यान विशेष गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये ‘कलारत्न’, ‘साहित्यरत्न’, ‘क्रीडारत्न’, ‘नृत्यरत्न’ आणि ‘संगीतरत्न’ या पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून शहरातील गुणवंतांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याचा महोत्सव समितीचा प्रयत्न आहे.

*“उद्योगनगरीबरोबरच पिंपरी-चिंचवडची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख अधिक दृढ व्हावी”*

पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र या शहराला कला, साहित्य, नाट्य, संगीत आणि लोकसंस्कृतीचीही समृद्ध परंपरा लाभली आहे. शहरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन ही सांस्कृतिक ओळख अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल. हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विविध पिढ्या, कलाकार आणि नागरिकांना एकत्र आणणारे सांस्कृतिक व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालणाऱ्या या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात शहरातील नागरिक, कलाप्रेमी, महिला, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

●महोत्सवाचा तपशील

कालावधी : दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६

स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

आयोजक : पिंपरी-चिंचवड महोत्सव समिती

●स्पर्धा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

श्री. मनोज डाळीम्बकर — ८२३७३३२२११

श्री. राजेंद्र बंग — ९८२२३१३०६६

— मा. महापौर कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका

पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे आयोजन
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन; सद्भावना दिनानिमित्त सामूहिक शपथ.
Next Article माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंवर्धनाची प्रतिज्ञा
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?