Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»फ्रिंज एरिया’तील रहिवासी विकासाचा मार्ग मोकळा; ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय!
पिंपरी चिंचवड

फ्रिंज एरिया’तील रहिवासी विकासाचा मार्ग मोकळा; ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय!

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 30, 2026Updated:September 30, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
  • पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांसह ७ नगरपरिषदा व २ नगरपंचायतींलगतच्या क्षेत्रांना लाभ
  • शेती विभागातील जमिनींवर नियमानुसार रहिवासी विकासाला परवानगी
  • रस्त्यांच्या जोडणीसाठी एकसमान कार्यपद्धती लागू; शहरांलगतच्या हजारो जागामालकांना दिलासा

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू झाल्याने, प्राधिकरणाच्या हद्दीतील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या सभोवतालच्या निर्धारित परिघस्त अंतरातील शेती विभागातील जमिनींवर रहिवासी बांधकामासाठी परवानग्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्षेत्रांतील रस्ते जोडणीबाबत स्पष्टता आणण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिपत्रकाद्वारे विशेष कार्यपद्धती निश्चित केली आहे. या निर्णयामुळे हजारो जागामालक व नागरिकांना दिलासा मिळणार असून, बांधकाम क्षेत्रासह नियोजित विकासालाही चालना मिळणार आहे.

एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (यूडीसीपीआर-२०२०) महापालिका हद्दीपासून २ किलोमीटर, नगरपरिषद हद्दीपासून १ किलोमीटर आणि नगरपंचायत हद्दीपासून अर्धा किलोमीटर अंतरातील शेती विभागातील जमिनींवर निर्धारित अधिमूल्य आकारून रहिवासी विभागातील अनुज्ञेय वापरास परवानगी देण्याची तरतूद आहे. मात्र, अशा विकासासाठी संबंधित क्षेत्रात सलग व परस्पर जोडलेले रस्त्यांचे जाळे असणे अपेक्षित आहे. या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. लोणावळा नगरपरिषद वगळता, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, ७ नगरपरिषदा आणि २ नगर पंचायतींच्या परिघस्त क्षेत्रातील प्रस्तावांसाठी ही कार्यपद्धती तातडीने लागू करण्यात आली आहे.

या कार्यपद्धतीनुसार मंजूर प्रादेशिक योजनेतील रस्ते, रद्द झालेल्या प्रारूप विकास योजनेतील रस्ते, प्रत्यक्ष अस्तित्वातील रस्ते तसेच संमतीने प्रस्तावित करण्यात येणारे रस्ते यांचा एकत्रित विचार करून विकास परवानगी प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रस्तावातील अंतर्गत रस्ते लगतच्या जागा अथवा उपलब्ध रस्त्यांच्या जाळ्याशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘पीएमआरडीए’चा नवीन ‘स्ट्रक्चर प्लॅन’ प्रसिद्ध होईपर्यंत रद्द झालेल्या प्रारूप विकास योजनेतील रस्त्यांचाही सदर क्षेत्रातील विकास परवानगी प्रस्तावांमध्ये विचार करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्यक्ष जागेवर नियमानुसार आवश्यक रुंदीचा पोहोच रस्ता उपलब्ध असल्यास संबंधित प्रस्तावास मंजुरी देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या निर्णयामुळे परिघस्त क्षेत्रातील अनधिकृत व विस्कळीत विकासाला आळा बसून नियोजनबद्ध विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

 

ठळक मुद्दे

१. अंतराची मर्यादा : महापालिका हद्दीपासून २ कि.मी., नगरपरिषद हद्दीपासून १ कि.मी. आणि नगरपंचायत हद्दीपासून ०.५ कि.मी.पर्यंतचे क्षेत्र परीघस्त (Fringe Area) क्षेत्र म्हणून विचारात घेतले जाईल.

२. लागू क्षेत्र : लोणावळा नगरपरिषद वगळता २ महापालिका, ७ नगरपरिषदा व २ नगरपंचायतींलगतच्या पीएमआरडीएतील परीघस्त क्षेत्रासाठी ही कार्यपद्धती लागू असेल.

३. रस्त्यांचा एकत्रित विचार : मंजूर प्रादेशिक योजनेतील रस्ते, रद्द झालेल्या प्रारूप विकास योजनेतील रस्ते, प्रत्यक्ष अस्तित्वातील रस्ते आणि संमतीने प्रस्तावित रस्ते विचारात घेतले जातील.

४. अंतर्गत रस्त्यांची जोडणी : नवीन ‘स्ट्रक्चर प्लॅन’ प्रसिद्ध होईपर्यंत रद्द झालेल्या विकास योजनेतील (डीपी) रस्त्यांचा विकास परवानगी प्रस्तावांमध्ये विचार करण्यात येणार आहे. तसेच, अंतर्गत रस्ते लगतच्या जागांना किंवा रस्त्यांना जोडणे बंधनकारक असेल.

५. पोहोच रस्ता : प्रत्यक्ष जागेवर आवश्यक रुंदीचा पोहोच रस्ता उपलब्ध असल्यास संबंधित प्रस्तावाला मंजुरी देण्याची कार्यवाही केली जाईल.

६. अधिमूल्य आकारणी : संबंधित जमिनीच्या वार्षिक मूल्यदर तक्त्यातील दराच्या १५ टक्के दरानुसार अधिमूल्य आकारणी करण्यात येईल.

 

💬🗣शहरालगतच्या परिघस्त भागात विकासाचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यूडीसीपीआरमधील तरतुदींमुळे या भागातील रहिवासी विकास नियोजनबद्ध पद्धतीने करता येणार असून, आवश्यक रस्त्यांचे सुसंगत जाळे विकसित होण्यासही मदत होईल. नवीन कार्यपद्धतीमुळे रहिवासी विभागातील वापर अनुज्ञेय होणार असून, या भागाच्या सुनियोजित विकासाला गती मिळेल.”

— डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त,“पीएमआरडीए

Fringe area pmrda
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाराष्ट्राच्या एव्हरेस्टवर भगवा फडकला! हॅप्पी फॅमिली ट्रेकर्सचा थरारक ट्रेक यशस्वी
Next Article सप्टेंबरअखेर महापालिका सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?