Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»सफाई मित्र सुरक्षा शिबिर संपन्न; ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची तपासणी
पिंपरी चिंचवड

सफाई मित्र सुरक्षा शिबिर संपन्न; ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची तपासणी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 1, 2026Updated:October 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी
शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. २८ आणि ३० सप्टेंबर रोजी झालेल्या या शिबिरांमध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज आणि ल या दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील आतापर्यंत ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. थेरगाव येथील स्व. कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथेही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरांमध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह आदींची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे, आरोग्यविषयक चांगल्या सवयी अंगीकारणे आणि आजाराची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याबाबतही सफाई सेवकांना मार्गदर्शन करण्यात आले.

“सफाई सेवक हे शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे घटक आहेत. कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोग्याची नियमित तपासणी करून योग्य ती काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्यविषयक समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आल्यास त्यावर वेळेत उपाययोजना करता येतात. त्यामुळे सफाई मित्रांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे,” असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.कचरा वेचकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डॉ. ठेंगल यांच्या हस्ते सुरक्षा साधनांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.

शिबिराच्या माध्यमातून समाज विकास विभागाच्या महिला व बालकल्याण योजनांचीही माहिती देण्यात आली. महिला बचतगट, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी स्वयंरोजगार, कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण तसेच महिलांसाठी विविध आर्थिक सहाय्य योजनांची माहिती देऊन पात्र महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

“महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आर्थिक सहाय्य, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा या योजनांचा उद्देश आहे. या योजनांचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणास मदत होईल,” असेही डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी नमूद केले.

या शिबिरास डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शंकर मोसलगी, डॉ. कुलभूषण कुलकर्णी, डॉ. तुषार जाधव, सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजेश भाट, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, कांचनकुमार इंदलकर, योगेश फल्ले तसेच आरोग्य निरीक्षक, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सफाई सेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहा. आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड यांनी मानले.

Safai mitra suraksha shibir
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसप्टेंबरअखेर महापालिका सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त
Next Article दिवेघाट दुर्घटनेतील विद्यार्थ्यांना श्रद्धांजली; उद्या आळंदी बंदचे आवाहन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?