हिंदवी न्यूज |
आळंदी : दिवेघाट येथे झालेल्या दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळून आळंदी बंद पाळण्याचे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी केले आहे.
या बंदमध्ये आळंदीतील सर्व व्यापारी, व्यावसायिक, संस्था तसेच नागरिकांनी सहभागी होऊन शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




