Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा शनिवारी भव्य नागरी सत्कार सोहळा
पिंपरी चिंचवड

विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा शनिवारी भव्य नागरी सत्कार सोहळा

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता अण्णासाहेब बनसोडे यांचा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे हे भूषवणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, खासदार पार्थ पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश दादा लांडगे, शंकर जगताप, गोपीचंद पडळकर, उमाताई खापरे, शंकर मांडेकर, बापू पठारे, सुनील कांबळे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, सुनील टिंगरे आदी उपस्थित राहणार आहेत.

हॉटेल रागा पॅलेस, काळेवाडी विजयनगर पिंपरी (मदर टेरेसा उड्डाणपूल लगत) येथे सकाळी ११ वाजता, हा भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे. याचे आयोजक महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब बनसोडे गौरव समिती पिंपरी चिंचवड शहर आणि सहआयोजक नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे युवा मंच पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने समितीचे पदाधिकारी सुरेश निकाळजे, अंजना गायकवाड, गोपाळ मोरे, निलेश निकाळजे, प्रमोद क्षीरसागर, गंगाताई धेंडे, नितीन ओव्हाळ, संदीप पिसाळ, राहुल सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे ध्येय ठेवून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक वारसा पुढे नेणारी ही एक महत्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती होणे हे अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे.

अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभाग घेऊन सुरुवात केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, पिंपरी विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष पद असा अण्णासाहेब बनसोडे यांचा राजकीय चढता आलेख आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ऐतिहासिक संस्थेवर अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करून सरकारने त्यांचा आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा सन्मान केला आहे अशी भावना शहरवासीयांच्या मनात आहे. अण्णा बनसोडे यांच्या या नियुक्तीमुळे शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे हा आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने शनिवारी (दि.३) सकाळी ११ वाजता हजारो नागरिकांनी हॉटेल रागा पॅलेस येथील भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Anna bansode
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेतर्फे थेरगाव येथे सफाई मित्र सुरक्षा शिबिर संपन्न
Next Article ७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?