Author: Hindavinewsnetwork@gmail.com
हिंदवी न्यूज | पिंपरी शिवसेना (शिंदे गट) युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी कुणाल जगनाडे यांची पश्चिम महाराष्ट्र उपशहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव (पश्चिम महाराष्ट्र) तथा नगरसेवक विश्वजित बारणे यांच्या उपस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कुणाल जगनाडे यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले. ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, संसदरत्न खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण प्रचार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य…
‘माझी प्रवास गाथा’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न हिंदवी न्यूज | पिंपरी ‘आयुष्य हा एक प्रवास असून तो समरसून केल्यास मानवी जीवनाचे सार्थक होते!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक रमेश इनामदार यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक शहाजी कांबळे लिखित ‘माझी प्रवास गाथा’ या सहाव्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रमेश इनामदार बोलत होते. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे उपाध्यक्ष गोपाळ भसे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी, लेखक शहाजी कांबळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. रमेश इनामदार पुढे म्हणाले की, ‘गोडसे भटजी यांच्या ‘माझा प्रवास’ या प्रवासवर्णनाने मराठी साहित्यात या नव्या साहित्यप्रकाराची समृद्ध परंपरा निर्माण…
प्रा. डाॅ. महेश देवकर लोकशिक्षक बाबा भारती साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित हिंदवी न्यूज | पिंपरी ‘विश्वाला शांततेची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बुद्धविचार हा समाज जोडणारा विचार आहे!’ असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे केले. महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान – पिंपरी आणि महात्मा फुले महाविद्यालय – पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या स्मरणार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडीज विभागप्रमुख प्रा. डाॅ. महेश देवकर यांना लोकशिक्षक बाबा भारती साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करताना डाॅ. श्रीपाल सबनीस…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या मासिक विज्ञान व्याख्यानमालेतील १३९वे विज्ञान व्याख्यान शनिवारी (दि. १ ऑगस्ट २०२६) उत्साहात पार पडले. सायन्स पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमात दीपक जोशी (ज्योतिर्विद्या परिसंस्था, पुणे) यांनी ‘धूमकेतू कसे शोधावे?’ या विषयावर मार्गदर्शन करत धूमकेतूंचा शोध, त्यामागील वैज्ञानिक प्रक्रिया आणि खगोलशास्त्रातील विविध पैलूंवर उपस्थितांना रंजक माहिती दिली. कार्यक्रमासाठी मराठी विज्ञान परिषदेचे विनय र. र. हे उपस्थित होते. त्यांनी व्याख्यात्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. दीपक जोशी यांनी प्रेक्षकांना स्लाईड शोच्या माध्यमातून अवकाश निरीक्षणाविषयी उद्बोधक माहिती दिली. विविध धुमकेतूच्या रचना व त्यांच्या अवकाशातील भ्रमणाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण…
बँक खाती, विमा आणि डिजिटल सेवांचा विस्तार; धोरणकर्ते व बँकांसाठी हे संशोधन ठरणार मार्गदर्शक हिंदवी न्यूज | पिंपरी रत सरकारच्या ‘प्रधानमंत्री जन धन योजने’ने (PMJDY) देशातील बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या मोठ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यात आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यात अत्यंत प्रभावी भूमिका बजावली आहे, असा निष्कर्ष डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) ‘ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर’ मधील संशोधनातून समोर आला आहे. हे संशोधन डॉ. निलोफर ए. सय्यद यांनी त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या संशोधनाद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत ‘जन धन’ योजनेचे लाभ प्रत्यक्ष कसे पोहोचत आहेत, बँकिंग सेवांचा वापर…
हिंदवी न्यूज | पिंपरी आळंदी येथील “अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालविकास दिंडोरी प्रणित केंद्रात“ दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त केंद्रात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरु पौर्णिमा उत्सवात षोडशोपचार पूजा, भूपाळी महानैवेद्य, आरती, महानैवेद्य व आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण केंद्र व बाहेरील परिसराचे स्वच्छता करण्यात आली. केंद्राच्या मुख्य दारासमोर सुंदर, रेखीव आकर्षक रंगीबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती. फुले –पाने यांनी आकर्षक सजावट करून रांगोळी लक्षवेधी झाली. संपूर्ण केंद्रात विद्युत रोषनाई करण्यात आली होती. तसेच विविध आकर्षक फुलांचे हार व तोरणांनी संपूर्ण केंद्र सजवण्यात…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी “सार्वजनिक स्वच्छतागृह धोरण” तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये महिलांसाठी योग्य ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावेत, अशी मागणी माजी नगरसेविका व शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरीजादेवी प्रवीण कुदळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. कुदळे यांनी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना बुधवारी पत्र दिले. या पत्रात पुढे म्हटले आहे की, सुमारे ३० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न कायमच दुर्लक्षित राहिला आहे. नवीन सार्वजनिक स्वच्छतागृह धोरणामध्ये महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक व सुरक्षित ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा समावेश करावा. यामध्ये स्वतंत्र,…
हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिक व शिवप्रेमी संभाजी बारणे यांची महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी नुकतेच बारणे यांना नियुक्तीपत्र दिले. १९०६ साली न्या. गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि न. ची. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था स्थापन केली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या विकासासाठी जगभर काम करणारी ही अग्रेसर संस्था आहे. या संस्थेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या सल्लागारपदी पुढील दोन वर्षांसाठी संभाजी बारणे यांची निवड करण्यात आली आहे. बारणे यांनी चित्रपट, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक संपन्न; प्रायोगिक प्रकल्पाच्या तातडीने अंमलबजावणीच्या सूचना हिंदवी न्यूज | पिंपरी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती द्यावी. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व नियोजनासंदर्भातील सर्व कार्यवाही तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करावा आणि नागरिकांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पुणे व पिंपरी चिंचवड…